धाराशिव : आरोपी नामे- विवेक विनायक निंबाळकर, 2) आकाश गायकवाड इतर दोन इसम यांनी दि.25.01.2024 रोजी 13.30 ते दि. 22.03.2024 रोजी 01.30 वा. सु. समता नगर मेन रोड वर धाराशिव येथे फिर्यादी नामे- मच्छिंद्र चंदर तुंदारे, वय 46 वर्षे, रा. सिध्देश्वर बाजार, मेन रोड समता नगर धाराशिव यांना नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन किरणा मालाचे गोडावून पेटवून देण्याची धमकी देवून जाळात फेकून देण्याचा धाक दाखवून दि. 21.03.2024 रोजी 22.00 ते दि. 22.03.2024 रोजी 01.30 वा. सु. किराणा मालाचे गोडावून विस्तवाने पेटवून देवून दुकानाचे व मेडीकल जाळून मच्छिंद्र तुंदारे यांचे अंदाजे 5,00,000₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मच्छिंद्र तुंदारे यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 436, 384, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र कायदा कलम 3(1) (आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण
तामलवाडी :आरोपी नामे-1)निजाम गयासोद्दीन शेख, 2) गयसोद्दीन शेख, 3) हैदर मुसा शेख सर्व रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.20.03.2024 रोजी 18.00 वा. सु. तामलवाडी येथे बोगद्याखाली व आत्माशांत हॉटेल जवळ रोडवर फिर्यादी नामे- रमेश शंकर उबाळे, वय 58 वर्षे, रा. होनसळ ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांना व नमुद आरोपींनी मोटरसायकलचा धक्का लागल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रमेश उबाळे यांनी दि.22.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 324,323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.