• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी हकीम काझी यास १० वर्षे सक्तमजुरी

admin by admin
February 3, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास
0
SHARES
1.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – येथील विशेष न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी हकीम काझी याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 21,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने पीडित मुलीला तिच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला फूस लावून हुमनाबाद येथे नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीने पीडित मुलीला 26 मे 2019 पर्यंत रूममध्ये ठेवले आणि त्या दरम्यान तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

सरकार पक्षाने या प्रकरणात 11 साक्षीदार तपासले. पीडित मुलीची साक्ष, मुख्याध्यापकाची साक्ष आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपी हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. विशेष न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी आरोपीला भारतीय दंड संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये शिक्षा सुनावली. आरोपीला सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत.

या प्रकरणाचा सविस्तर तपशील

सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत की, घटनेच्या दोन वर्षापूर्वीपासून आरोपी व पीडितेचे कुटुंब एकत्र ऊसतोड कामगार म्हणून विविध ठिकाणी काम करीत होते. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेस तिच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन पिडीतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ऊस तोडीचे काम संपल्यानंतर आरोपीने पीडितेस व तिच्या आईस एका बांधकाम मिस्त्रीकडे मजूर म्हणून काम मिळवून दिले. सदर घटनेच्या दिवशी दिनांक ०७.०५.२०१९ रोजी पिडीत ही एकटी बांधकामाच्या कामावर जात असताना आरोपी हकीम काझी याने आज बांधकामावर काम नाही, दुसरीकडे काम आहे असे म्हणून त्याच्या अपसिंगा येथील शेतात घेऊन गेला व त्यानंतर तिथून बसने हुमनाबाद येथे घेऊन गेला, तेथे गेल्यानंतर येथे माझ्या ओळखीचे खूप लोक आहेत असे म्हणून तिला बुरखा घालण्यास दिला व तेथून जहीराबाद येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने पीडितेस आरोपीच्या लहान मुलासोबत रूमवर दिनांक २६.५.२०१९ रोजी पर्यंत ठेवले त्या दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. दिनांक ०७.०५.२०१९ रोजी पीडिता ही कामावरून परत आली नाही म्हणून तिचा शोध घेतला परंतु ती न मिळून आल्याने व त्या संदर्भाने बांधकाम मिस्त्री कडून माहिती मिळाल्याने पिडीतेच्या आईने आरोपी हकीम मेहबूब काजी रा. रामनगर, सांजा रोड, उस्मानाबाद यांच्या विरुद्ध तिच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेले म्हणून तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पो.स्टे. आनंदनगर उस्मानाबाद येथे गु.र.नं. 392G/2098 कलम ३६३ भा. द. वि. नुसार गुन्हा नोंद झाला. सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय डी. व्ही. सिद्धे व पीएसआय एस. जी. भुजबळ यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर प्रकरणाची सुनावणी तत्कालीक विशेष न्यायाधीश  एस. डी. जगताप व विशेष न्यायाधीश श्रीमती टी.जी. मिटकरी यांचे न्यायालयात पूर्ण झाली. सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध दोषसिद्धीसाठी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणातील पीडितेची नैसर्गिक साक्ष, मुख्याध्यापकाची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी हा विवाहीत असुन त्यास तीन मुले असतानाही अल्पवयीन पिडीतेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेले साक्षीदार व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरूनश्रीमती टी. जी. मिटकरी, विशेष न्यायाधीश, उस्मानाबाद यांनी आरोपी हकीम मेहबूब काझी, रा. रामनगर, सांजा रोड, उस्मानाबाद यास भा.द.वि. चे कलम ३६३ अन्वये ०३ वर्षे सक्तमजुरी व रू ३,०००/- रू द्रव्यदंड, कलम ३६६ अन्वये ०५ वर्षे सक्तमजुरी व रू ३,०००/- रू द्रव्यदंड, कलम ३७६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व रू ५,०००/- रू द्रव्यदंड, तसेच बा. लें. अ.प्रतिबंधक कायदा कलम ४ व ६ अन्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व रू 5,000/- रू द्रव्यदंड अशी शिक्षा दिनांक ३१.०१.२०२५ रोजी सुनावली. सर्व शिक्षा आरोपीने एकत्रीत भोगावयाची आहे.

सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणुन महिला पोलीस कॉन्स्टेबल ब.नं. १४०६ सी. बी. तर्फेवाड, पो.स्टे. आनंदनगर, धाराशिव यांनी काम पाहिले.

Previous Post

कराळीतील दोन विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या आरोपीनां अटक का नाही?

Next Post

धाराशिव : न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल

Next Post
धाराशिव : न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल

धाराशिव : न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group