धाराशिव – जिल्ह्यातील कळंब, उमरगा, वाशी आणि शिराढोण येथे चोरीच्या घटनांची नोंद झाली असून, पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.
हॉटेलमधील साहित्य चोरी; तिघे अटकेत
शिराढोण पोलिसांनी करजकल्ला (ता. कळंब) येथील “हॉटेल दिपाली” मध्ये चोरी करताना तिघांना रंगेहाथ पकडले. आरोपींनी रात्री १ वाजता हॉटेलचे शटर उघडून फ्रीजमधील सामान, सिलेंडर टाकी आणि इलेक्ट्रिक शेगडी चोरण्याचा प्रयत्न केला. आरोपींची नावे सुरज गुलाब पवार, अमोल नागनाथ पवार आणि रवी शहाजी पवार (सर्व रा. सुरडी, ता. केज, जि. बीड) अशी आहेत. शिराढोण पोलिसांनी भा.दं.सं. कलम ३३१(१), ३३४(१), ३०५, ६२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कळंबमध्ये दुचाकी चोरी
कळंब येथील बाबानगरमध्ये रामदास शंकर गोडगे (वय ७४) यांची २२,००० रुपये किंमतीची हिरो मोटरसायकल (MH 25 AB 9430) घरासमोरून चोरीला गेली. ही घटना ३ मार्च ते ४ मार्च दरम्यान घडली असून, १६ मार्च रोजी तक्रार दाखल करण्यात आली. कळंब पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उमरगा येथे ९५ हजारांची बुलेट चोरी
उमरगा शहरातील गणेश चित्रमंदिराजवळ राहणारे सोहन धनाजी राठोड (वय ४२) यांची ९५,००० रुपये किंमतीची बुलेट मोटरसायकल (MH 13 DL 4777) चोरीस गेली. ही घटना १४ मार्च रात्री ११ ते १५ मार्च सकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. उमरगा पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वाशी येथे पानबुडी मोटर आणि केबल चोरी
वाशी तालुक्यातील डोंगरवाडी शिवारात ८ मार्च ते ९ मार्च दरम्यान संतोष चतुरभुज मुळे (रा. पिटी घाट, ता. केज, जि. बीड) आणि अन्य शेतकऱ्यांच्या शेतातून ७ पानबुडी मोटर आणि ८३० फूट केबल चोरीस गेली. चोरी झालेल्या साहित्याची एकूण किंमत ६३,००० रुपये असून, वाशी पोलिसांनी कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसांचा तपास सुरू
जिल्ह्यात दुचाकी, हॉटेलमधील साहित्य आणि शेतातील मोटर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.