• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद निवडणूक : प्रभाग १५ मध्ये मतदारांचा विक्रमी उत्साह तर प्रभाग ७ मध्ये निरुत्साह

२१ डिसेंबरला होणार 'दूध का दूध...' ! तोपर्यंत १७ दिवस फक्त 'आकडेमोड' आणि 'तर्कवितर्क'!

admin by admin
December 4, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 2 mins read
कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!
0
SHARES
826
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेसाठी २ डिसेंबर रोजी झालेले मतदान शांततेत पार पडले असले तरी, मतदारांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात इतर सात नगरपरिषदांच्या तुलनेत धाराशिवमध्ये सर्वात कमी म्हणजेच ६१.१४ टक्के मतदान झाले आहे. आता २० डिसेंबरला उर्वरित ३ जागांचे मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने, शहराची सत्ता कोणाच्या हाती जाणार, यासाठी उमेदवारांना आणि शहरवासीयांना तब्बल १७ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी (ओबीसी महिला राखीव) ६ उमेदवार रिंगणात असून, नगरसेवकपदाच्या ३९ जागांसाठी २०१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. शहरात एकूण ९४ हजार ००६ मतदारांपैकी ५७ हजार ४७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३०,३६५ पुरुष, २७,१०७ महिला आणि ६ इतर मतदारांचा समावेश आहे.

प्रभागनिहाय मतदानाची स्थिती:

शहरातील मतदानाचा कल पाहता काही प्रभागांत चुरस पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते.

  • सर्वाधिक मतदान: प्रभाग क्रमांक १५ मध्ये मतदारांनी विक्रमी उत्साह दाखवत सर्वाधिक ७१.८० टक्के मतदान केले.

  • सर्वात कमी मतदान: प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्वात कमी ५३.४३ टक्के मतदानाची नोंद झाली.

प्रभागनिहाय झालेले मतदान (टक्केवारी):

प्रभाग एकूण मतदार झालेले मतदान टक्केवारी
१ ४५६६ २७९४ ६१%
२ ४०८१ २३०९ ५६.५७%
३ ३३६४ २०१८ ५९.९८%
४ ४८२० २९३२ ६०.८२%
५ ३८१४ २४९५ ६५.४१%
६ ३५२४ २२३४ ६३.३९%
७ ५२३६ २७९८ ५३.४३%
८ ४०८४ २४८४ ६०.८२%
९ ४१०१ २२०२ ५३.६९%
१० ३५८६ १९५६ ५४.५४%
११ ४४८४ २६२६ ५८.५६%
१२ ४२६७ २६०८ ६१.६९%
१३ ५९४० ३६२४ ६१%
१४ ४५७४ २९१३ ६३.६८%
१५ ५९५९ ४२७९ ७१.८०%
१६ ५८४१ ३५४९ ६०.७६%
१७ ४७५४ ३०९६ ६५.१२%
१८ ६१३९ ३९५५ ६४.४२%
१९ ५६३७ ३२७९ ५८.१६%
२० ५२८३ ३३२७ ६२.९७%

नगरसेवक पदाच्या एकूण ४१ जागांपैकी ३९ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. कोर्टातील प्रलंबित प्रकरणांमुळे ३ जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती, जी आता २० डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

कार्यकर्त्यांची गणिते आणि धाकधूक

निवडणूक प्रक्रिया संपताच गल्लीबोळात आणि पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी जातीय समीकरणे आणि प्रभागातील मतदानाची आकडेमोड करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार असल्याने, पुढील १७ दिवस राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाणार आहेत. या निकालावरच नगर परिषदेत कोणता पक्ष सत्तेचा झेंडा रोवणार आणि नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचा फैसला होणार आहे.

 

Previous Post

 लाचखोरी भोवली! लोहाराच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह ‘एपीआय’ला ३ वर्षांची सक्तमजुरी

Next Post

१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

Next Post
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group