नळदुर्ग : आरोपी नामे-दगडु हरीश्चंद्र राठोड, संजय दगडू राठोड, शेवला दगडु राठोड, निर्मला संजय राठोड, मनोज दगडु राठोड, सर्व रा. मानमुडी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 17.06.2024 रोजी 20.00 वा. सु. मानमुडी तांडा येथे फिर्यादी नामे- सुलाबाई राजु राठोड, वय 50 वर्षे, रा. मानमुडी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा मुलगा आकाश राठोड यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकून मारहाण करुन गंभीर जखमी केले. व शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुलाबाई राठोड दि.18.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 307, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : आरोपी नामे-आकाश इराप्पा धोत्रे, शुभम अंबुलगे, मुख्तार व इतर अनोळखी दोन इसम रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी मार्च 2024 ते दि. 17.06.2024 रोजी 20.45 वा. सु. शास्त्रीनगर उमरगा येथे फिर्यादी नामे-संतोष रमेश लोहार, वय 39 वर्षे, रा. जवाहर शास्त्रीनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवाहाराचे कारणावरुन मोटरसायकलवर घेवून जावून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादीचा मृत्यु होईल असे माहित असताना ही बाटलीतील पेट्रोल घरामध्ये टाकून काडीपेटीने घर पेटविण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संतोष लोहार यांनी दि.18.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 308, 452, 365, 323, 504, 506, 507, 120 (ब), 109, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-विकास विलास कांबळे, पुजा विकास कांबळे, सिंधुबाई कांबळे यांनी दि. 12.06.2024 रोजी 18.00 वा. सु. तिर्थ बु येथे फिर्यादी नामे-गणेश नागनाथ सगट, वय 28 वर्षे, रा. तिर्थ बु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कत्ती कुऱ्हाडीचा दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व घराचा दरवाजा तोडून नुकसान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणेश सगट दि.18.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 452, 326, 427, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : आरोपी नामे-समाधान मच्छिंद्र शिंदे, सागर मच्छिंद्र शिंदे दोघे रा. केमवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 18.06.2024 रोजी 16.00 वा. सु. केमवाडी शिवार शेत गट 339 येथे फिर्यादी नामे- महादेव विश्वनाथ शिंदे, वय 47 वर्षे, रा. केमवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचा भाउ संतोष शिंदे यांना नमुद आरोपींनी शेतात चारी खांदु नका असे बोलण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव शिंदे दि.18.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : आरोपी नामे-संतोष विश्वनाथ शिंदे, महादेव विश्वनाथ शिंदे, विजय संतोष शिंदे, विश्वनाथ वसुदेव शिंदे, अनुसया संतोष शिंदे, साक्षी संतोष शिंदे सर्व रा. केमवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिवयांनी दि. 18.06.2024 रोजी 15.30 वा. सु. केमवाडी शिवार येथे फिर्यादी नामे- सागर उर्फ गोरख मच्छिंद्र शिंदे, वय 32 वर्षे, रा. केमवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व समाधान मच्छिंद्र शिंदे यांना नमुद आरोपींनी शेता मध्ये चारी खोदण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सागर शिंदे दि.18.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 143, 147, 149,324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.