परंडा : फिर्यादी नामे- विकास दिलीप गोपणे, वय 24 वर्षे, रा. कौडगाव ता. परंडा जि. धाराशिव यांचे घरातील व नातेवाईक हे घरात झोपलेले असताना व फिर्यादी हे उसतोड मजुर यांच्याकडे झोपण्याकरीता गेले असता त्यांचे राहाते घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 02.01.2024 रोजी 22.00 ते दि. 03.01.2024 रोजी 04.00 वा. सु. तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैजन व रोख रक्कम 16,000₹ असा एकुण 1,43,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास गोपणे यांनी दि.07.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 457,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-हामीद खुदबुद्दीन इंनामदार, वय 65 वर्षे, रा. अंबेजवळगा ता. जि. धाराशिव हा.मु. मिल्ली कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव हे अंबेजवळगा येथील त्यांचे घरी नसताना घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 25.12.2023 रोजी 13.00 ते दि. 06.01.2024 रोजीचे सायंकाळी 18.00 वा. सु तोडून आत प्रवेश करुन घरातील 300 किलो वजनाचे 50 सोयाबीनचे कट्टे एकुण 1,35,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हामीद ईनामदार यांनी दि.07.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 457,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे- खंडु संगप्पा तोडकर, वय 27 वर्षे, रा. कसई ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 45,000 ₹ किंमतीची हिरो सप्लेंन्उर प्लस कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.पी. 4889 ही दि.28.12.2023 रोजी 01.00 ते 04.30 वा. सु. विवेकानंद नगर पापनास रोड येथील अमोल शिंदे यांच्या घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- खंडु तोडकर यांनी दि.07.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-मिनाक्षी बापुराव कानडे, वय 55 वर्षे, रा. तिर्थ खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव या व त्यांची सोबतची महिला नळदुर्ग बसस्थानक येथे बसमध्ये चढत असताना मिनाक्षी कानडे यांचे गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व मंगळसुत्र अंदाजे 25,000 ₹ किंमतीचे हे दि. 07.01.2024 रोजी 14.30 वा. सु. संशयीत आरोपी नामे- सुनिता शेषेराव सकट रा. उदगीर ता. उदगीर जि. लातुर यांनी चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मिनाक्षी कानडे यांनी दि.07.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान फिर्यादी मिनाक्षी कानडे यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथकाने संशयीत आरोपी नामे- सुनिता शेषेराव सकट रा. उदगीर ता. उदगीर जि. लातुर हिस नळदुर्ग बसस्थानक येथुन ताब्यात घेवून तिचे कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता तिने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन नळदुर्ग पोलीसांनी नमुद आरोपीस अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.
मारहाण
ढोकी :आरोपी नामे- 1) वसंत आबाराव काकडे, 2) अर्जुन आबाराव काकडे, 3)भागाबाई वसंत काकडे, 4) बालाजी वसंत काकडे, 5) प्रकाश वसंत काकडे, 6) अमर अर्जुन काकडे, सर्व रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 07.01.2024 रोजी 13.00 वा. सु. टाकळी ढोकी येथे फिर्यादी नामे-दत्तात्रय ज्ञानदेव काकडे, वय 31 वर्षे, रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तु आमचा पाण्याचा पाईप का फोडला असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाना, उसाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांची आई व बहिण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मराहण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दत्तात्रय काकडे यांनी दि.07.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143,147, 148, 149 भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1),(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.