• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 14, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचा दणका: साडेआठ तोळे सोन्यासह सराईत घरफोड्या गजाआड

admin by admin
June 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचा दणका: साडेआठ तोळे सोन्यासह सराईत घरफोड्या गजाआड
0
SHARES
832
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली आहे.  कृष्णा ऊर्फ पिंटु खडेल शिंदे, रा. मुरुड, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्याच्याकडून साडेआठ तोळे (८४ ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३,८७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले होते.  या पथकात सपोनि अमोल मोरे, सपोनि  सचिन खटके, पो.ह. विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, नितीन जाधवर, पोना. बबन जाधवर, चापोह/महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, आणि विनायक दहीहंडे यांचा समावेश होता. पेट्रोलिंग करत असताना, पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कृष्णा शिंदे हा वाठवडा शिवारातील एका हॉटेलसमोर थांबलेला आहे. 

या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.  स्थानिक गुन्हे शाखेत आणून चौकशी केली असता, आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात अनेक घरफोड्या केल्याचे कबूल केले. 

चोरीच्या मालाबाबत विचारणा केली असता, आरोपीने सांगितले की प्रत्येक गुन्ह्यानंतर मिळालेले सोन्याचे दागिने आणि पैसे ते आपसात वाटून घेत असत.  त्याच्या वाट्याला आलेले दागिने त्याने मुरुड येथील घरी ठेवले होते.  या दागिन्यांची विक्री करून त्याला मुरुडमध्ये प्लॉट घेऊन घर बांधायचे होते, असेही त्याने सांगितले. 

या यशस्वी कामगिरीमध्ये अंगुलीमुद्रा शाखेचे सपोनि सुधीर कराळे आणि त्यांच्या पथकाचेही सहकार्य लाभले.  पुढील कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह आनंदनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. 

Previous Post

 ‘राणे’ आले, आणि ‘राणा’ पळाले? कट्टर हिंदुत्वाचा डोस की वेळेवर साधलेला योगायोग!

Next Post

धाराशिवच्या राजकीय आखाड्यात निधीवरून ठिणगी: राणेंच्या ‘दादा’गिरीला ओमराजेंचे जशास तसे प्रत्युत्तर!

Next Post
धाराशिवच्या राजकीय आखाड्यात निधीवरून ठिणगी: राणेंच्या ‘दादा’गिरीला ओमराजेंचे जशास तसे प्रत्युत्तर!

धाराशिवच्या राजकीय आखाड्यात निधीवरून ठिणगी: राणेंच्या 'दादा'गिरीला ओमराजेंचे जशास तसे प्रत्युत्तर!

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group