धाराशिव: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. ०५.१२.२०२४ रोजी रात्री ८ वाजता येडशी टोल नाक्यावर कारवाई करत जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घातला आहे. रामदास शिवाजी दराडे (वय ४०, रा. रामेश्वर, ता. भूम, जि. धाराशिव) या आरोपीला पिकअप वाहनातून (क्र. एमएच २५ एजे ३१४६) ३ जर्सी गाई आणि एक लहान कालवड असे ४ जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाताना अटक करण्यात आली.
आरोपीने जनावरांना वाहनात दाटीवाटीने बांधून निर्दयतेने वागल्याचे आढळून आले. जनावरांची किंमत ४८,००० रुपये आणि पिकअप वाहनाची किंमत ४,००,००० रुपये असा एकूण ४,९८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(ड) (ई), ए.एम.ए.पी.ॲक्ट कलम ५, ५(अ), ५(ब), ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.