बेंबळी : आरोपी नामे- 1)सुहास बळीराम शिवलकर, 2) विकास बळीराम शिवलकर, 3)संदेश सुहास शिवलकर, 4) आण्णासाहेब उर्फ सतिश विश्वनाथ शिवलकर, 5) तुकाराम विश्वनाथ शिवलकर सर्व रा. महादेववाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी 11.00 वा. सु. महादेववाडी पाटी येथे फिर्यादी नामे-सुरेंद्र वसंत होळकर, वय 42वर्षे, रा. शिवाजीनगर महादेववाडी ता. जि. धाराशिव यांना शेत रस्त्याचे वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे चुलते निळकंट होळकरहे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी-सुरेंद्र होळकर यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे
तामलवाडी :आरोपी नामे- 1) कार क्र एमएच 05 डीई 0466 चा चालक व अनोळखी एक महिला, यांनी दि. 17.11.2023 रोजी 13.00 वा. सु. तुळजापूर ते सोलापूर जाणारे एनएच 52 रोडवर देवराज धाब्याजवळ फिर्यादी नामे-राहुल महेश अवचार, वय 38 वर्षे, रा. रा. ऑल 03,38 मॅजेस्ट्री पार्क, वडाची वाडी, उंद्री चौक पुणे यांचे कार समोर सतत मागे पूडे कार करीत असल्यामुळे फिर्यादीने गाडी थांबवून नमुद अरोपींना विचारल्याचे कारणावरुन नमुद अनोळखी महिलेने फिर्यादीस शिवीगाळ करुन धक्का देवून खाली पाडून हातास गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- राहुल अवचार यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कवठा तांडा येथे चोरी
उमरगा : फिर्यादी नामे- बेबी अनिल कांबळे, वय 49 वर्षे, रा. कवठा तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव या त्यांचे पत्राचे शेडला कुलूप लावून लातुर येथे गेल्या असता अज्ञात व्यक्तीने दि. 09.11.2023 रोजी 12.00 ते दि. 16.11.2023 रोजी 16.00 वा. सु. कुलूप तोडून घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातील 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व चार साड्या असा एकुण36,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बेबी कांबळे यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.