परंडा : आरोपी नामे- 1)तुकाराम जाधवर, 2) अनिता तुकाराम जाधवर, 3) हरीभाउ उत्तम जाधवर, 4) छबाबाई हारीभाउ जाधवर सर्व रा. तांबेवाडी. ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.12.11.2023 रोजी 10.30 वा. सु. तांबेवाडी येथे फिर्यादी नामे-पुजा सुभाष जाधवर, वय 25 वर्षे, रा. तांबेवाडी ता. भुम जि. धाराशिव यांना जमीनीच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची बहिण संगीता जाधवर या भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- पुजा जाधवर यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे- 1) रविकुमार विजयकुमार पाटील, रा. चिंचोली ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 14.11.2023 रोजी 18.30 वा. सु. चिंचोली येथील मारुती मंदीरासमोर फिर्यादी नामे-अविनाश सतिश घोडके, वय 24 वर्षे, रा. चिंचोली ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना जुन्या भांडणाचे कारणावरुन नमुद अरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन कुह्राडीने डावे कानाचे पाठीमागे व पाटीत मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे वडीलास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अविनाश घोडके यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : आरोपी नामे- 1) ज्ञानेश्वर मनोहर बादने, रा. कंटेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 16.11.2023 रोजी 15.00 वा. सु. कंटेकुर ता. उमरगा फिर्यादी नामे- ओमकार सुधाकार जमादार, वय 22 वर्षे, रा. कंटेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांना जुन्या भांडणाचे कारणावरुन नमुद अरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन मोबाईल फेकुनव काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- ओमकार जमादार यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे- 1)निळकंठ राम होळकर, 2) सुरेश वसंत होळकर, 3) महेश नामदेव निंबाळकर, 4) संजय चंद्रकांत होळकर, 5) सुनिल माणिक निंबाळकर सर्व रा. शिवाजी नगर ता. जि. धाराशिव, 6) रोहित बिभीषण घोडके, रा. नांदुर्गा ता. जि. धाराशिव यांनी दि. 14.11.2023 रोजी 11.30 वा. सु. महादेववाडी पाटी येथे फिर्यादी नामे- सुहास बळीराम शिवलकर, वय 42 वर्षे, रा. महादेववाडी, ता. जि. धाराशिव यांना शेतात काट्याचे लिंबगाड का टाकले या कारणावरुन नमुद आरोपींतानी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने डाव्या हातावर माराहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुहास शिवलकर यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 143, 147, 148,भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.