धाराशिव : दि. 14.10.2023 रोजी रात्री 01.00 ते 02.00 वा. सु आळणी येथील आळणी 01 टॉवर येथील जिओ कंपनीचे 300 मीटर डीसी सप्लाय केबल, एअरटेल कंपनीचे 90 मीटर डी.सी. सप्लाय केबल, आयडीया कंपनीचे 300 मीटर डी सी सप्लाय केबल असा एकुण अंदाजे 2,89,500₹ किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धनंजय शिवाजी सावंत, वय 42 वर्षे, व्यवसाय टेक्नीशन, रा.कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : फिर्यादी नामे- संगीता शंभु शिंदे, वय 37 वर्षे, रा. तित्रंज ता. भुम जि. धाराशिव यांचे तित्रंज शिवारातील शेत गट नं 585 मधील विहरीवर तीन एच. पी. ची पार्थ कंपनीची सौर उर्जाची पानबुडी मोटार अंदाजे 15,000₹ किंमतीची दि. 11.11.2023 रोजी 17.00 ते दि. 13.11.2023 रोजी 15.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संगीता शिंदे यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे- मुकुंद पांडुरंग देशमुख, वय 49 वर्षे, रा. गौर, ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. रामहरी नगर भुम हे व त्यांची पत्नी व मुलगी असे दिवाळी सणा निमीत्त गावी जात असताना दि. 11.11.2023 रोजी 11.15 ते 13.30 वा. सु भुम बसस्थानक येथुन अहमदनगर ते धाराशिव बसने प्रवास करत असताना प्रवासा दरम्यान फिर्यादीचे पत्नीचे चॉकलेटी रंगाचे पर्स मधील 60ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 1,85,800₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मुकुंद देशमुख यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे- जालींदर महादेव सलगर, वय 33 वर्षे, रा. वडचीवाडी, ता. भुम जि. धाराशिव यांचे गळ्यातील 23 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे 65,000₹ किंमतीची तसेच आण्णासाहेब बिरमल चोरमले, यांचा जिवो कंपनीचा मोबाईल अंदाजे 4,000₹ किंमतीचा, तसेच सभेमधील वैभव हुंबे, बाळु नायकिंदे, शिवाजी चव्हाण, उमेशचंद्रकांत भोरे, यांचे मोबाईल फोन असे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जालींदर सलगर यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : दि. 12.11.2023 रोजी 09.00 वा. सु. पुर्वी शासकिय वैधकिय महाविध्यालय व रुग्णालय धाराशिव येथील मुलींच्या वस्तीगृहा मागील 62.5 के.व्ही.ए. जनरेटरची एक बॅटरी 130 ए ॲक्साईट रेड जनरेटरची बॅटरी अंदाजे 7,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. फिर्यादी नामे- रामराव पागोजी जंगले, वय 56वर्षे, व्यासाय वीज तंत्री, रा. मेडीकल कॉलेज पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे- जालींदर औताडे, वय 46 वर्षे, रा. गोरमाळा, ता. भुम जि. धाराशिव हे दि. 15.11.2023 रोजी 07.20 ते 08.00 वा. सु. शिवाजी चौक वाशी ते जगदाळे मामा कॉलेज येथे असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे मिरवणुकीमध्ये असताना जालींदर औताडे यांचे गळ्यातील 60 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व पॅन्डल असा एकुण अंदाजे 2,50,000 ₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जालींदर औताडे यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : भुम पोलीस ठाणेचे पथक दि. 16.11.2023 रोजी 01.45 वा. सु. भुम पोलीस ठाणे हद्दीत नांन्नजवाडी फाटा ता.भुम जि. धाराशिव येथे पेट्रोलिंग करत असताना पथकास आरोपी नामे- 1) शरद मुरलीधर काळे, वय 19 वर्षे, रा.आष्टी ता. परतुर जि. जालना, 2) हरीविजय पंढरीनाथ शिंदे, वय 24 रा. हातेली ता. घनसांगवी जि. जालना, 3) कालीदास सिताराम काळे, वय 23 रा. आष्टी ता. परतुर जि. जालना, 4) गणेश सर्जेराव काळे, वय 23 रा. आष्टी ता. परतुर जि. जालना, 5)सुदाम बालासाहेब काळे, रा हातेली ता. घनसांगवी जि. जालना हे दरोडा टाकण्याच्या तयारीने स्वीफट डिझायर कार क्र एमएच 15 ई. पी. 7429 सह दरोड्याचे साहित्य व घातक शस्त्रासह भुम पोठाचे पथकास मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी- बाबासाहेब बबुराव जाधवर, वय 38 वर्षे, पोलीस हवालदार 1279 नेमणुक पोलीस ठाणे भुम यांनी दि.16.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 399,402 भा.दं.वि.सं. सह 37(1) मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.