कळंब : फिर्यादी नामे-संजय बालाजी सुह, वय 287 वर्षे, र. खडकी ता.जि. धाराशिव यांचा अंदाजे 3 ते 4 लाख रुपये किंमतीचा महिंद्रा अर्जुन 605 ट्रॅक्टर क्र एमएच 25 ए.डब्ल्यु 9283 लाल रंगाचा ट्रॅक्टर हेड हा दि. 17.04.2024 रोजी 21.00 वा. सु. ते दि. 18.04.2024 रोजी 06.00 वा. सु. खडकी शिवारातील शेत गट नं 75 मधून ता. कळंब येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संजय सुह यांनी दि.21.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-शेषेराव सुभाष पवार, वय 35 वर्षे, रा. कासारी ता. बाशी जि. सोलापूर यांची अंदाजे 28,000₹ किंमतीची हिरो एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.सी. 0233 ही दि. 19.04.2024 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. जुने बसस्थानक तुळजापूर येथे भाजी मंडई येथील स्वच्छता ग्रहाचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शेषेराव पवार यांनी दि.21.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-सारीका सिताराम पौळ, वय 41 वर्षे, रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव या दि. 21.04.2024 रोजी 16.45 वा. सु. नविन बसस्थानक तुळजापूर येथुन बार्शी गाडी मध्ये चढत असताना सारीका पौळ यांचे गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अंदाजे 60,000₹ किंमतीचे हे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सारीका पौळ यांनी दि.21.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.