• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस

धाराशिव जिल्ह्यात कलाकेंद्रांवर पोलिसांचे धाडसत्र; अटी-शर्तींचे उल्लंघन, ५ ठिकाणी गुन्हे दाखल

admin by admin
September 21, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
‘तुळजाई’नंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; जिल्ह्यातील 5 कला केंद्रांवर छापे, बंद खोलीत नृत्याचे प्रकार उघड
0
SHARES
915
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात अवैध आणि नियमबाह्य कृत्यांचे अड्डे बनलेल्या कलाकेंद्रांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील अनेक कलाकेंद्रांवर छापे टाकले. या कारवाईत परवान्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ५ कलाकेंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव आणि कळंब तालुक्यातील विविध कलाकेंद्रांची झाडाझडती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवान्यातील नियमांना धाब्यावर बसवून ही कलाकेंद्र चालवली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी पोलिसांनी आळणी फाट्यावरील पिंजरा लावणी सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राचे वैभव धनंजय माळी (रा. आळणी), साई लोकनाट्य सांस्कृतिक कलाकेंद्राचे नितीन विनायक चव्हाण (रा. आळणी), चोराखळी पाटीवरील गौरी लोकनाट्य कलाकेंद्राचे सुदर्शन श्रीकृष्ण शेळके (रा. येडशी) आणि महाकालीका लोकनाट्य कलाकेंद्राचे राजेंद्र माळी (रा. चोराखळी) व कालीका कलाकेंद्राच्या निर्मला मोहनराव जाधव (रा. परभणी, ह.मु. चोराखळी) यांच्याविरोधात येरमाळा आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये एकूण ५ स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

महाकाली कला केंद्र गुन्हेगारीचे केंद्र?

या कारवाईत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र हे गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकेंद्रावर मोठी हाणामारी झाली होती. इतकेच नव्हे तर, याच कलाकेंद्रातील तीन महिला एका खून प्रकरणात आरोपी असल्याचे गंभीर वास्तव उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक कार्यालयाने महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे आणि कलाकेंद्रांच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांना मोठा हादरा बसला असून, पोलीस प्रशासनाच्या या ‘सफाई’ मोहिमेचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील शहरांचा चेहरामोहरा बदलणार, ‘नमो उद्यान’साठी १० कोटींचा निधी मंजूर

Next Post

धाराशिवमध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल, ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल, ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group