धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील ढोकी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी जवळपास ९०,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक २४ मार्च २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने रात्री गस्त सुरू ठेवली होती. यावेळी ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्या जवळील जुना पळसप रोडवरील तेरणा माध्यमिक प्रशालेजवळ रोडाच्या कडेला अंधारात पाच इसम संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता, दोन इसम मोटरसायकलसह पळून गेले, तर उर्वरित तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, या तिघांकडे दरोड्याचे साहित्य, कत्ती, कटावणी, कटर, ६०० रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल (मूल्य ३०,००० रुपये) आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल (मूल्य ६०,००० रुपये) असा एकूण ९०,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१) संतोष प्रभाकर कुराडे (वय ३६ वर्षे, रा. सुभाष नगर अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली)
२) अविनाश प्रभाकर कुराडे (वय ३४ वर्षे, रा. सुभाष नगर अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली)
३) प्रविण राजाराम मोरे (वय ३० वर्षे, रा. चांदोल वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली)
तपासादरम्यान आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आरोपींचा गुन्हे अभिलेख तपासला असता, धाराशिव आणि सांगली जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे उघडकीस आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली आणि ढोकी पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर केले. त्यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक ९७/२५ अंतर्गत कलम ३१०(४), ३०१(५) भादंवि सह कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, चालक रत्नदीप डोंगरे आणि नितीन भोसले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भूम पोलिसांनी रंगेहाथ पकडले
भूम – दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भूम पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. घटनास्थळी दरोड्याचे साहित्य, शस्त्रे आणि साधने जप्त करण्यात आली आहेत.
दिनांक २२ मार्च २०२५ रोजी रात्री ९:०० ते १०:४० वाजेच्या दरम्यान, पेटसांगवी गाव ते चिंचपूर ढगे गाव या परिसरात दरोड्याच्या उद्देशाने काही इसम एकत्र आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चंदरराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाड टाकली.
तपासादरम्यान पोलिसांना आरोपींकडे दरोड्याचे साहित्य आढळून आले. यामध्ये स्टील बोल्ट कटर, लहान स्टील कटर, कटावणी, लोखंडी पक्कड, एडजेस्टेबल पाना, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, लहान पाने, सुरा, लोखंडी तारेचा आकडा, तीन टॉर्च, मास्क, हॅन्ड गलब्जचे तीन जोड, कापडी कोपऱ्या खिशाला चैन असलेल्या दोन कोटोप्या आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट असा दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अटक आरोपींची नावे:
१) सदा गोरख भोसले (वय ४४ वर्षे, रा. हाजीपूर, ता. आष्टी, जि. बीड)
२) अमोल हैवान काळे (वय २३ वर्षे, रा. चिखली, ता. आष्टा, जि. बीड)
३) नितीन जिजाबा भोसले (वय २८ वर्षे, रा. चिखली, ता. आष्टा, जि. धाराशिव)
४) जयदेव इलामती भोसले (वय ४५ वर्षे, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टा, जि. बीड)
५) विशाल जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टा, जि. बीड)
फरार आरोपी:
ढेबऱ्या रामु चव्हाण (रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड)
तपासादरम्यान आरोपींनी दरोड्याच्या उद्देशाने एकत्र येऊन साहित्य बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा क्रमांक ३१०(४), ३१०(५) भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चंदरराव सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.