धाराशिव :आरोपी नामे-1) रामचंद्र व्यंकटेश जोशी व्यवसाय- बॅक मॅनेजर भारतीय स्टेट बॅक शाखा येडशी रा. ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 06.11.2018 ते दि. 12.09. 2019 रोजी पावेतो एस. बी. आय.बॅक येडशी येथे बॅक मॅनेजर पदाचा गैरवापर करुन त्यांचा मुलगा कपिल रामचंद्र जोशी याचे शिक्षणाकरीता मंजुर झालेली शैक्षणिक कर्जाची रक्कम 18,68,600₹ हे शैक्षणिक कामासाठी वापरायची आहे हे माहित असतानाही त्यापैकी 6,87,007 ₹ ही रक्कम त्यांनी वैयक्तीक वापराकरीता वापरुन अफरातफर करुन बॅकेची फसवणुक केली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेंद्र भाउ भोर, वय 40 वर्षे, व्यवसाय- शाखाधिकारी (मॅनेजर) भारतीय स्टेट बॅक शाखा येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.09.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 420,409 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
परंडा :आरोपी नामे-1) मुनाफ मशरीफ सौदागर, 2) संतोष भालचंद्र मोरे दोघे रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 02.01.2012 रेाजी 11.00 ते दि. 01.02.2022 रोजी पावेतो दुय्यम निबंधक कार्यालय परंडा येथे फिर्यादी नामे- मोहन खंडेराव कुलकर्णी, वय 53 वर्षे, व्यवसाय- कनिष्ठ लिपीक दुय्यम निबंधक यांचे कार्यालय, परंडा रा. मुक्ताई टेक्सटाईलच्या पाठीमागे, बार्शी रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे कार्यालयीन कामकाज करीत असताना नमुद आरोपींनी कट रचून सर्वे नं 26/2/ब च्या अनुषंगाने बनावट अकृशक आदेश तयार करुन संबंधीत प्लॉटधारक नामे चरीचंद साहेबराव गोडगे यांची तसेच शासनाची फसवणुक केली. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय, परंडा यांचे कार्यालयात नोंदणीसाठी दस्तऐवज सादर केला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मोहन कुलकर्णी यांनी दि.09.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 465,471,468,193,196,420,120(ब)भा.दं.वि.सं. सह नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.