धाराशिव: भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर मिळवलेल्या शानदार विजयाच्या आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याच्या सन्मानार्थ, शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार धाराशिव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली गुरुवार, दिनांक २२ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता जिजाऊ चौक, बार्शी नाका येथून सुरू होईल. या रॅलीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक उपस्थित राहणार आहेत.
रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल:
जिजामाता चौक (प्रारंभ) – धर्मवीर संभाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक (समारोप).
या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला वंदन करण्यात येणार असून, तमाम नागरिकांना या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रभक्तीचा जागर करण्याचे आवाहन सूरज साळुंके यांनी केले आहे.









