धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील सज्जा अणदूर मधील तलाठी धन्वंतर नागनाथ गायकवाड यांना 2000 रुपये लाच घेताना पकडले गेले होते . त्यांना न्यायालयाने 4 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश श्रीमती अंजू शेंडे.यांनी दिला.
प्रकरण:
- तक्रारदार: शिवाजी चव्हाण, रा. चव्हाणवाडी, ता. तुळजापूर
- आरोपी: धन्वंतर नागनाथ गायकवाड, तलाठी, सज्जा अणदूर ता. तुळजापूर
- गुन्हा: भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, 1988 कलम 7, 8, 13(1)(ड) सह 13(2)
- फिर्याद क्रमांक: पो.स्टे. तुळजापूर गु.र.नं 64/2015
- न्यायालय: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, धाराशिव
- निकाल तारीख: 20/07/2024
तपशील:
तक्रारदार शिवाजी चव्हाण यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या शेतजमिनीचा फेर मंडळ अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेऊन तसा 7/12 उतारा देण्यासाठी आरोपी तलाठी धन्वंतर गायकवाड यांनी 2000 रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी लाच प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर लाचलुखोर तलाठीला रंगेहाथ पकडण्यात आले.
शिक्षा:
न्यायालयाने आरोपी तलाठी धन्वंतर गायकवाड यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, 1988 कलम 7 अन्वये 3 वर्षांच्या कैदेची आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम 13(1)(ड) आणि 13(2) अन्वये 4 वर्षांच्या कैदेची आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्यांना 15 दिवसांची अतिरिक्त कैद भोगावी लागेल.