बेंबळी : आरोपी मयत नामे- दिपक उर्फ बाळु रोहीदास राठोड, वय 20 वर्षे, रा. शिंगोली तांडा ता. जि. धाराशिव हे दि.17.04.2024 रोजी 17.00 वा. सु. ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएस 8249 हे रुईभर तलावाचे कॅनल मध्ये निंबाळकर यांचे शेताजवळ दिपक राठोड यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हे हायगई व निष्काळजीपणे चालवून ट्रॅक्टर पल्टी होवून ट्रॅक्टर हेड दिपक राठोड यांचे छातीवर पडून गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची आई फिर्यादी नामे महानंदा रोहीदास राठोड, वय 50 वर्षे, रा. शिंगोली तांडा ता. जि. धाराशिव यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : आरोपी नामे-आजीम महताब सिकलकर व मयत नामे- मुस्तफा अब्दुलहामीद लोणी, रा. मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एक्स.6751 वरुन जात होते. दरम्यान आरोपी नामे-आजीम सिकलकर यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून फिर्यादी नामे-बाबु गोपा चव्हाण वय 54 वर्षे, रा. नाईकनगर सुं. ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 16.04.2024 रोजी 19.00 मुरुममोड ते मुरुम अक्कलकोट जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र 548 वरुन पायी जात होते. यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले मुस्तफा लोणी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर बाबु चव्हाण यांचा डावा हात कोपऱ्यातुन फॅक्चर होवून गंभीर जखमी झाले.व आरोपी नामे- आजीम सिकलकर स्वत:ही जखमी झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बाबु चव्हाण यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : मयत नामे-रमेश निलकंठ सोनटक्के, वय 55 वर्षे, रा. नळदुर्ग, व सोबत बाबु मारुती सोनटक्के, वय 60 वर्षे, रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 26.04.2024 रोजी 19.00 वा. सु. तुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग समोरील रोडवरुन छोटा हत्ती क्र एमएच 12 जीटी 3937 मधून जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे चालवून रमेश सोनटक्के यांचे छोटा हत्तीला समोरुन धडक दिली. या अपघातात रमेश सोनटक्के हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर बाबु सोनटक्के हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे मधुकर गणपती घोडके, वय 48 वर्षे, रा. शास्त्री चौक, नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.