धाराशिव : मयत नामे-रंजना किरण सानप, वय 28 वर्षे, रा. मुंकूद नगर धाराशिव यांनी दि.24.06.2024 रोजी 13.00 वा. पुर्वी राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-पती किरण बच्चाराम सानप, सासु सुनिता बच्चाराम सानप, सासरे बच्चाराम अग्णु सानप, दिर आण्णासाहेब बच्चाराम सानप, जावु सुलभा आण्णासाहेब सानप, त्यांची दोन मुले व सुलभाचा चुलता खाडे सर्व रा. मुकूंद नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी मयत हीस घराच्या बांधकामाचे देणे देण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन मानसिक व शारीरीक त्रास दिल्याने त्यांचे त्रासास कंटाळून रंजना सानप यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील कानिफनाथ भास्कर घुगे, वय 48 वर्षे, रा. इंदापुर ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि. 24.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं कलम 306, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गाडी पार्क करण्याच्या कारणावरुन मारहाण
तुळजापूर : आरोपी नामे-माउली चोपदार, आनंत चोपदार, बाळ चोपदार, विष्णू बनसोडे, व इतर एक इसम सर्व रा. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.23.06.2024 रोजी 19.00 ते 19.30 वा. सु. घाटशिळ रोड कृष्णाई एक्सीटीव्ह लॉज समोर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-सावन संजय बाबशेट्टी, वय 32 वर्षे, रा. वेताळनगर तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे भाउ सागर बाबशेट्टी यांना नमुद आरोपींनी गाडी पार्क करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व लोखंडी पट्टीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सावन बाबशेट्टी यांनी दि.24.06.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 143, 147, 149, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.