धाराशिव : आरोपी नामे-1) रोहिदास जाधव, 2) पवन (पुर्ण नाव माहित नाही), 3)अक्षय साळुंके,4)राजा संजु पवार सर्व रा. इंदीरानगर सांजा रोड धाराशिव यांनी दि.12.05.2024 रोजी 17.00 वा. सु. ए वन हॉटेल समोर धाराशिव येथे फिर्यादी नामे- आशाबाई सुभाष चव्हाण, वय 45 वर्षे, रा. इंदीरानगर सांजा रोड धाराशिव व त्यांचा मुलगा नामे- अजित सुभाष चव्हाण यांना नमुद आरोपींनी मागील भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेवून अजित चव्हाण यास काही न बोलताच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता व तलावारीने कानाजवळ व डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.तसेच फिर्यादीच्या गल्लीतील सुनिता लोखंडे यांचे घरावर दगडफेक करुन जातीवाचक शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आशाबाई चव्हाण यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 307, 323, 506, 34 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(2) (व्हि) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-1) सदाशिव क्षिरसागर, 2) भास्कर क्षिरसागर, 3) भाग्यश्री सदाशिव क्षिरसागर, 4) ज्योती भास्कर क्षिरसागर सर्व रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 08.05.2024 रोजी 23.00 ते 23.30 वा. सु. तुळजापूर लातुर रोडवर काक्रंबा शिवारात विश्व हॉटेल समोर ता. तुळजापूर येथे फिर्यादी नामे- प्रशांत पांडुरंग कानडे, वय 24 वर्षे, रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भाडंणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बिअरची बाटली, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रशांत कानडे यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-1)गणेश रंगनाथ माने, 2) विशाल बालाजी माने, 3) अजय शिवाजी मोरे, 4) पांडुरंग मोरे, 5) कमल मोरे, 6) योगीता जाधव, 7) सुलभा कोळगे, 8) बाळासाहेब कोळगे, 9) नितीन देविदास माळी, सर्व रा. पानवाडी ता. जि. धाराशिव व इतर चार इसम यांनी दि. 11.05.2024 रोजी 07.30 वा. सु. पानवाडी येथे फिर्यादी नामे- अक्षय दत्तात्रय माने, वय 26 वर्षे, रा. पानवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी नारळाच्या झाडाची फांदी का तोडत नाही या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, रॉड, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे आई वडील हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अक्षय माने यांनी दि.13.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.