धाराशिव – आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक धाराशिव विभागीय कार्यालयात पार पडली.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा अशी सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केली.
बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली:
- शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेल्वेचे अतिक्रमण: लातूर-कुर्डुवाडी रेल्वे मार्गावर रेल्वे विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवर बैठकीमध्ये चर्चा झाली. रेल्वेने अधिक भुसंपादन केले असल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, रेल्वे विभागाकडे जमीन असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
- निकृष्ट दर्जाची कामे: रेल्वेच्या बांधकाम विभागाने केलेली रस्ते आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अशा कामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. गेल्या 5 वर्षातील कामांचा अहवाल तयार करून तपासणी करण्याची सूचना देण्यात आली.
- धाराशिव रेल्वे स्टेशनचे विकास कार्य: धाराशिव रेल्वे स्टेशनचे अमृत अटल योजनेंतर्गत विकास कार्य प्रगतीपथावर आहे. या कामाचा दर्जा उच्च दर्जाचा राखावा आणि दर महिन्याला या कामाचा आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात आले.
- धाराशिव-तुळजापुर-सोलापूर नवीन रेल्वेमार्ग: धाराशिव-तुळजापुर-सोलापूर या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील जमिनीचे 70% अधिग्रहण पूर्ण झाले आहे आणि 30% जमीन अधिग्रहित झाल्यानंतरच रेल्वे लाइनचे काम सुरू होणार आहे.
- जलद गतीने काम पूर्ण करण्यासाठी बैठक: रेल्वे मार्गाचे भूसंपादन लवकर पूर्ण करणे आणि रेल्वेचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे उच्च पदस्थ अधिकारी आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना देण्यात आली.
- यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर , सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे व्यवस्थापक निरजकुमार डोहरे, शैलेंद्रसिंग परीहार (सी.पी.एम.), प्रदिप बनसोडे (उपअभियंता बांधकाम),सचिन गाणेर, एम. जगदिश, योगेश पाटील, आदित्य , एस. बी. कुलकर्णी आदीसह मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.