धाराशिव – जिल्ह्यात आवकाळी पावसाने गहू, ज्वारी. सह द्राक्षे बाग, सिताफळ, पेरु फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आज धाराशिव तालुक्यातील आंबेजवळगे, कारी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटी ने झालेल्या नुकसानीची पाहणी करून बळीराजाला धीर दिला. तसेच महसूल प्रशासनाला व कृषि विभागातील अधिकारी यांना तात्काळ नुकसानग्रस्त जिल्हयातील पंचनामे करण्यासाठी विनंती केली.
शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करुन जगवलेल्या फळबागांचे आवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या फळबागा माती मोल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. द्राक्षे बाग, सिताफळ, पेरु अशा सर्वच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, तर आता आवकाळी पावसाने न पाहवणारे नुकसान होत आहे. आंबेजवळगे व कारी परिसरात नुकसानीची पाहणी करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत हे सरकार सर्व सामान्याचे, शेतकऱ्यांचे असुन महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे प्राप्त होताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे तातडीने मदत मिळवुन देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शेतकऱ्यांना अश्वासीत केले.
यावेळी त्यांच्या समवेत डॉ देवेंद्र डोके, रामहरी सारंग, दत्तात्रय देसाई, श्रीकांत काळे, रवि आटपळकर, रवि शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी अमोल बिरंजे, विकास देसाई, बालाजी सारंग, महादेव सारंग, यांच्यासह संबंधीत गावातील लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.