वाशी : आरोपी नामे- 1) मच्छिंद्र येडबा सुकाळे, 2) बालाजी मच्छिंद्र सुकाळे, 3) राजुबाई मच्छिंद्र सुकाळे, 4)सोना बालाजी सुकाळे, सर्व रा. पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि.धाराशिव यांनी दि.05.12.2023 रोजी 14.00 वा. सु. पिंपळगाव लिंगी शिवारात गट नं 171 मध्ये त्यानंतर संध्याकाळी अंदाजे 07.00 व. सु. गावातील बबन सावंत यांचे घराचे जवळ फिर्यादी नामे-बिभीषण येडबा सुकाळे, वय 62 वर्षे, रा. पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि. धाराशिव व धाराशिव यांचा मुलगा नामे महावीर बिभीषण सुकाळे यांना नमुद आरोपींनी शेताच्या बांधाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने व कोयत्याने डोक्यात, तोंडावर व छातीवर जिवे मारण्याचे उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- बिभीषण सुकाळे यांनी दि.11.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 307, 326, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे- 1)संजय सुळ, रा. खडकी ता. कळंब जि. धाराशिव, 2) वैभव बोराडे, रा. डिकसळ ता. कळंब यांनी दि. 11.12.2023 रोजी सकाळी 07.30 वा. सु. मोहेकर कॉलेज डिकसळ येथील ग्राउंडवर फिर्यादी नामे-प्रविण अश्रुबा बांगर, वय 31 वर्षे, रा. जिजाउ नगर डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव, हे नमुद आरोपीं व खेळाडू हे मोहेकर कॉलेज डिकसळ येथील मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॅटस्मन आउट किंवा नॉटआउट या कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बॅटने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रविण बांगर यांनी दि.11.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324,504,506,34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम :आरोपी नामे- 1) संदीप दत्तु हाके, रा. करवंजी, ता. लोहारा जि. धाराशिव, यांनी दि. 05.12.2023 रोजी 09.30 वा. सु. येणेगुर येथील प्रदिप मदने यांचे संस्कार दिप हॉटेल मध्ये फिर्यादी नामे- काशीनाथ डिगंबर देवकर, वय 40 वर्षे, रा. करवंडी ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी सोसायटीचे निवडणूकीचे कारणावरुन शिवीगाळ करुन खुर्चीवरुन खाली ढकलून देवून बरगडीचे हाड फॅक्चर केले.लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- काशीनाथ देवकर यांनी दि.11.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.