धाराशिव : शहरात एका ३४ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २०१९ पासून ८ मे २०२५ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३४ वर्षीय महिलेला (नाव व गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) शहरातीलच एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने सन २०१९ पासून ते ८ मे २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पीडितेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडितेला मारहाण केली आणि तिच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने १६ मे २०२५ रोजी आनंदनगर पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. पीडितेने दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (लैंगिक संबंधांसाठी फसवणूक किंवा खोटे आश्वासन देणे), कलम ६९ (धमकी देणे), कलम ११५(२) (गंभीर दुखापत करणे), कलम ३५१(२) (लैंगिक अत्याचार) आणि कलम ३५१(३) (वारंवार लैंगिक अत्याचार करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.