• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, January 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ऑपरेशन ‘पत्ता कट’ की ‘टेबल टर्न’? : राणादादांनी ‘दिल्ली पॅटर्न’ला लावला घरचा रस्ता; अधिकृत उमेदवारांचा बळी देऊन अर्चना ताईंना ‘बॅकडोअर एंट्री’?

— धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा; २७ तारखेच्या ‘गेम’कडे राज्याचे लक्ष! —

admin by admin
January 24, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
“मी पेपर फोडणार नाही…!” राणा पाटलांची गुगली; नवरा म्हणतो ‘वेट अँड वॉच’, पोरगं म्हणतं ‘गेम ओव्हर’!
0
SHARES
2.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : “नियम तोडण्यासाठीच असतात,” हे वाक्य राजकारणात किती तंतोतंत लागू पडते, याचा थरार सध्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत पाहायला मिळत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने (हायकमांड) ‘एका घरात एकच पद’ हा नियम लावून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचे तिकीट कापले खरे, पण राणादादांनी आता थेट पक्षाच्या नियमालाच ‘शह’ देण्याची “गनिमी कावा” नीती आखली आहे.

लोकसभेला झालेला सव्वातीन लाखांचा पराभव विसरून, “खासदारकी हुकली तर हुकली, आता झेडपीचे अध्यक्षपद तरी द्या,” अशी अपेक्षा ठेवून रिंगणात उतरलेल्या अर्चना ताईंसाठी आता भाजपचे अधिकृत उमेदवार ‘बळीचा बकरा’ ठरणार का? याचीच चर्चा सध्या जोरात आहे.

‘दिल्ली पॅटर्न’ विरुद्ध ‘पाटील पॅटर्न’

भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरूमकर यांनी स्पष्ट केले होते की, दिल्लीच्या नियमानुसार ज्या घरात आधीच आमदार/खासदार आहेत, तिथे जिल्हा परिषदेचे तिकीट मिळणार नाही. या नियमामुळे राणा पाटलांच्या ‘होम पीच’वर अर्चना ताईंचा पत्ता कट झाला.

पक्षाने शिस्तीचा बडगा उगारत:

१. तेर गट: येथून जया नागनाथ नाईकवाडी यांना अधिकृत उमेदवारी (AB फॉर्म) दिली.

२. केशेगाव गट: येथून सुमन प्रवीण भद्रे यांना अधिकृत उमेदवारी दिली.

यामुळे अर्चना पाटील या दोन्ही ठिकाणांवरून तांत्रिकदृष्ट्या ‘अपक्ष’ उमेदवार ठरल्या आहेत. पण खरा ‘खेळ’ इथेच सुरू होतो!

राणादादांची ‘गुगली’: “मी पेपर आताच फोडणार नाही!”

अर्चना ताईंचे तिकीट कापले गेल्यावर सामान्य कार्यकर्ता हिरमुसला असता, पण इथे सूत्रे आमदार राणा पाटलांच्या हाती आहेत. त्यांनी सूचक विधान केले आहे— “मी आताच पेपर फोडणार नाही… दोन दिवस वाट पाहा!”

आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, राणा पाटलांनी एक जबरदस्त खेळी (Masterstroke) रचली आहे.

  • २७ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे.

  • या वेळेत भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर दबाव आणून किंवा त्यांची समजूत काढून (जया नाईकवाडी आणि सुमन भद्रे) त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावायचे.

  • एकदा अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली की, रिंगणात उरलेल्या अर्चना पाटील (अपक्ष) या भाजपच्या अघोषित उमेदवार ठरतील आणि पक्षाला नाईलाजाने त्यांना पाठिंबा द्यावा लागेल.

थोडक्यात काय, तर ‘दरवाजा बंद केला तर आम्ही खिडकीतून येऊ’ असा हा प्रकार आहे!

सोशल मीडियावर ‘इमोशनल अत्याचार’ आणि ‘दैवत’ कार्ड!

एकीकडे ही राजकीय रणनीती शिजत असताना, दुसरीकडे मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमने फेसबुकवर “रडा आणि लढायला लावा” ही मोहीम सुरू केली आहे.

जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना टार्गेट करत व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये कार्यकर्त्यांनी कहर केला आहे. पोस्टचा सारांश असा:

“आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी काम करतो, धमक्या खातो, ते फक्त पाटील कुटुंबासाठी. पाटील कुटुंब हेच आमचे ‘दैवत’ आहे. जर आमच्या देवाला (अर्चना ताईंना) उमेदवारी मिळणार नसेल, तर आम्ही मंदिरात (पक्षात) कोणासाठी जायचे? दत्ताभाऊ, आम्हाला उत्तर हवंय, नाहीतर सामान्य कार्यकर्त्याला किंमत नाही, असं समजू.”

हा सरळ सरळ पक्षाला केलेला ‘इमोशनल ब्लॅकमेल’ आहे. “तिकीट द्या, नाहीतर बंड करू किंवा काम थांबवू,” असा हा गर्भित इशारा आहे.

पक्षश्रेष्ठी सहन करणार का?

आता प्रश्न असा उरतो की, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश नेतृत्व ही खेळी उघड्या डोळ्यांनी पाहणार का?

  • जर अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली, तर तो पक्षाच्या शिस्तीचा भंग ठरेल.

  • आणि जर माघार घेतली नाही, तर अर्चना पाटील बंडखोरी करून लढणार का?

लोकसभेत अजित पवार गटाकडून लढताना ‘घड्याळ’ हातात बांधले होते, तिथे पराभव झाला. आता जिल्हा परिषदेत ‘कमळ’ मिळवण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे “हाय रे देवा, येथेही नशीब फुटके निघाले” अशी वेळ येऊ नये, यासाठी २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंतचा थरार पाहण्यासारखा असेल.

धाराशिवची जनता आता एकाच गोष्टीची वाट पाहत आहे— ‘पेपर’ फुटल्यावर नक्की कोणाचा ‘कार्यक्रम’ होणार? अधिकृत उमेदवारांचा की पक्षशिस्तीचा?


Previous Post

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

Next Post

निष्ठावंतांच्या हाती ‘धतुरा’, आयारामांना ‘शिरा’! धाराशिवच्या अंबेजवळगा गटात भाजपला बंडखोरीचं ग्रहण

Next Post
निष्ठावंतांच्या हाती ‘धतुरा’, आयारामांना ‘शिरा’! धाराशिवच्या अंबेजवळगा गटात भाजपला बंडखोरीचं ग्रहण

निष्ठावंतांच्या हाती 'धतुरा', आयारामांना 'शिरा'! धाराशिवच्या अंबेजवळगा गटात भाजपला बंडखोरीचं ग्रहण

ताज्या बातम्या

एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव: ‘पाप’ राणादादांचे, ‘खापर’ पिंगळेंवर! पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी अखेर शोधला ‘बळीचा बकरा’

January 25, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

रस्ता मागितल्याच्या कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण

January 25, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिवमध्ये पतीनेच मारला पत्नीच्या दागिन्यांवर डल्ला; जाब विचारताच बेदम मारहाण

January 25, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

 विश्वासघात! ग्रील बसविण्यासाठी आलेल्या कामगारांनीच लांबवले ९१ हजारांचे सोन्याचे दागिने

January 25, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून १९ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; देवसिंगा येथील घटना, पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

January 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group