• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक: “पेपर फोडायचा नसतो म्हणे…”; तानाजी जाधवरांचा राणा पाटलांना खोचक टोला!

admin by admin
January 23, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात भाजपचा चौकार, ठाकरे गटाला धक्का; विजयानंतर ‘रिलस्टार’ वरून कलगीतुरा…
0
SHARES
803
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव:  धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, आता शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप नेत्यांमध्ये ‘सोशल वॉर’ रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निवडणुकीबाबत केलेल्या एका विधानावर शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी फेसबुक पोस्टद्वारे खोचक टोला लगावला आहे.

नेमका प्रकार काय?

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवरून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. याच संदर्भात आ. राणा पाटील यांनी “मी आताच पेपर फोडणार नाही, दोन दिवस कळ सोसा,” असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेत तानाजी जाधवर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत राणा पाटलांना लक्ष्य केले आहे.

जाधवर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पेपर फोडायचा नसतो म्हणे… अहो, पेपरमध्ये नुसता गोंधळ होता म्हणून का?” त्यांच्या या एका ओळीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

काय होता तो ‘सस्पेन्स’ ड्रामा?

अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांत मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्चना पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी “आई माघार घेणार आहे,” अशी कुजबूज केल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू असतानाच, सायंकाळी ५ वाजता खुद्द राणा जगजितसिंह पाटील यांनी एन्ट्री घेतली.

जेव्हा पत्रकारांनी त्यांना अर्चना पाटील यांच्या माघारीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी, “मी आताच पेपर फोडणार नाही… दोन दिवस वाट पाहा!” असे उत्तर दिले होते.

बाप-लेकाच्या विधानांत विरोधाभास?

एकीकडे मुलाने माघारीची भाषा करणे आणि दुसरीकडे वडिलांनी ‘सस्पेन्स’ कायम ठेवणे, यामुळे हा गोंधळ घरातला आहे की राजकीय रणनीतीचा भाग, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याच संभ्रमावर बोट ठेवत तानाजी जाधवरांनी हा ‘पेपर फुटी’चा टोला लगावला आहे. आता यावर राणा पाटील काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

 डिकसळ गटातही शिंदे गटाची ‘उभारी’ भाजपच्या जीवावर…

Next Post

धाराशिव: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अर्जांची छाननी पूर्ण; ९३८ जिल्हा परिषद तर १३२१ पंचायत समिती अर्ज वैध

Next Post
धुरळा धाराशिवचा: नवऱ्यांची धावपळ अन्‌ बायकांची ‘खुर्ची’साठी धडपड!

धाराशिव: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अर्जांची छाननी पूर्ण; ९३८ जिल्हा परिषद तर १३२१ पंचायत समिती अर्ज वैध

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ: घरफोडी, दुचाकी आणि विजेच्या तारेची चोरी; तिन्ही प्रकरणी गुन्हे दाखल

March 12, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंब: जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; १५ ते १८ जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण

March 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार;

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची तक्रार केल्याचा राग; वाघोलीत ५६ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नाचताना पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर लोखंडी कत्तीने हल्ला

March 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group