धाराशिव: जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी एकूण ५५ जागेसाठी ९३८ आणि पंचायत समितीसाठी आठ तालुक्यातील ११० जागेसाठी १३२१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
जिल्हा परिषद: २७ अर्ज अवैध
जिल्हा परिषद निवडणूक गटांसाठी आठ तालुक्यातून एकूण ५५ जागेसाठी ९६७ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. छाननीनंतर त्यापैकी ९३८ अर्ज पात्र ठरले असून, २७ अर्ज विविध कारणांनी अवैध ठरवण्यात आले आहेत.
-
धाराशिव तालुक्यात सर्वाधिक २६८ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी २४९ वैध तर १७ अर्ज अवैध ठरले आहेत.
-
कळंब तालुक्यात १५८ आणि तुळजापूर तालुक्यात १३९ अर्ज वैध ठरले आहेत.
-
परंडा, वाशी आणि लोहारा या तीन तालुक्यांमध्ये एकही अर्ज अवैध ठरलेला नाही; येथील सर्व अर्ज छाननीअंती पात्र ठरले आहेत.
-
सध्या २ अर्जांवरील हरकतींची मुदत प्रलंबित आहे.
पंचायत समिती: छाननीनंतर १३२१ अर्ज पात्र
पंचायत समिती गणांसाठी जिल्हाभरातून एकूण १३६० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३२१ अर्ज वैध ठरले असून ३८ अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले आहेत.
-
धाराशिव तालुक्यात पंचायत समितीसाठी २८७ पैकी २६७ अर्ज वैध ठरले असून १९ अर्ज अवैध ठरले आहेत.
-
तुळजापूर तालुक्यात १९६, उमरगा १९५ आणि कळंब २१७ अर्ज वैध ठरले आहेत.
-
परंडा तालुक्यात प्राप्त झालेले सर्व १४८ अर्ज वैध ठरले आहेत.
-
पंचायत समिती स्तरावर केवळ एका अर्जावर हरकतीची मुदत शिल्लक आहे.
तालुकानिहाय अर्जांची स्थिती एका दृष्टीक्षेपात:
| तालुका | जि.प. वैध अर्ज | पं.स. वैध अर्ज |
| धाराशिव |
२४९
|
२६७
|
| तुळजापूर |
१३९
|
१९६
|
| भूम |
८७
|
१३३
|
| परंडा |
९२
|
१४८
|
| उमरगा |
११७
|
१९५
|
| वाशी |
४५
|
६५
|
| लोहारा |
५१
|
१००
|
| कळंब |
१५८
|
२१७
|
| एकूण |
९३८
|
१३२१
|
छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निवडणूक रिंगणात नेमके किती उमेदवार उरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





