पुणे: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, हडपसर आणि लातूर दरम्यान एक विशेष रेल्वे धावणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. ही रेल्वे गाडी २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे.
गाडीचे तपशील खालीलप्रमाणे:
गाडी क्रमांक – ०१४२९ (लातूर ते हडपसर)
- सुटण्याची वेळ: लातूरहून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी..
- थांबे: हरंगुळ, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, जेऊर, दौंड.
- पोहचण्याची वेळ: हडपसर येथे दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी.
- प्रवासाचा कालावधी: ६ तास १० मिनिटे.
- सेवेचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार.
गाडी क्रमांक – ०१४३० (हडपसर ते लातूर)
- सुटण्याची वेळ: हडपसरहून दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी…
- थांबे: दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, हरंगुळ.
- पोहचण्याची वेळ: लातूर येथे रात्री ९ वाजून २० मिनिटांनी.
- प्रवासाचा कालावधी: ५ तास १५ मिनिटे.
- सेवेचे दिवस: सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार.