तुळजापूर : चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण केल्यामुळे बायकोने भावाच्या मदतीने खून केल्याची घटना ईटकळ येथे घडली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे-1)आश्विनी बसवेश्वर जळकोटे, रा. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव व 2) सागर सुभाष धबडे, हे नात्याने बहिण भाउ असुन व इतर तीन अनोळखी इसम यांनी दि.17.01.2024 रोजी 19.00 वा. सु. कसई पाटी ता. तुळजापूर येथे मयत नामे- बसवेश्वर भिमाशंकर जळकोटे, वय 34 वर्षे, रा. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन यातील मयत हे त्यांचे पत्नीचे चारित्र्यावर संशय का घेतो व नेहमी मारहाण करतो या कारणावरुन लाथाबुक्यांने जब्बर मारहाण करुन त्यास चारचाकी वाहनाने जोरात धडक मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. आशा मजकुराच्या मयताची बहिण फिर्यादी नामे- वनिता सिध्देश्वर ममाने, वय 35 वर्षे, रा. कसई ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 302, 337, 338, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसरा खून
भूम : चारित्र्याचा संशय घेतल्याने बायकोने दिराच्या मदतीने नवऱ्याचा खून निर्घृण खून केल्याची घटना भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मयत मयत नामे- भगवान भरत मिसाळ हा पत्नी योगिता भगवान मिसाळ हीचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ करून मारहाण करीत होता. त्यामुळे आरोपी नामे-1) योगिता भगवान मिसाळ, 2) रविराज भगवान मिसाळ दोघे रा. पाटसांगवी ता. भुम जि. धाराशिव व इतर दोन अनोळखी इसम यांनी दि. 16.01.2024 रोजी 21.30 वा. सु. मयताचे घराचे पाठीमागे पाटसांगवी शिवार येथे मयत नामे- भगवान भरत मिसाळ, वय 35 वर्षे, रा. पाटसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन यातील मयत यास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठ्याने मारहाण करुन जिवे ठार मारले.आशा मजकुराच्या मयताची बहिण फिर्यादी नामे- रेखा तुकाराम गुंड, वय 40 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली जामखेड ता. जि. अहमदनगर यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 302, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उसने घेतलेल्या पैश्यावरून मारहाण
ढोकी :आरोपी नामे-1)महादेव ज्ञानोबा ढेकणे, रा. कौडगाव ता. जि. धाराशिव यांनी दि. 14.01.2024 रोजी सायंकाळी 17.00 वा. सु. मंगेश कदम यांचे हॉटेल समोरील रोडवर कौडगाव येथे फिर्यादी नामे-रघुनाथ यशवंत कदम, वय 70 वर्षे, रा. कौडगाव ता. जि. धाराशिव यांना हात उसने घेतलेले पैसे देण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रघुनाथ कदम यांनी दि. 18.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.