पुणे – माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मंत्रीपद गेल्यापासून तणावाने विळखा घातला आहे. त्यांच्या स्वभावात झालेल्या बदलामुळे घरातील वातावरणही तणावग्रस्त झाले आहे. मात्र, याचा क्लायमॅक्स चक्क अपहरणाच्या नाटकाशी जोडला जाईल, हे कोणालाही वाटले नसेल!
तानाजी सावंत यांना दोन मुले—गिरीराज (वय ३५) आणि ऋषिराज (वय ३०). आज सकाळी वडील आणि धाकट्या ऋषिराज यांच्यात किरकोळ वाद झाला. पण पुढे जे घडलं, त्याने सगळ्यांना अवाक केलं. नाराज ऋषिराज याने स्वतःचेच अपहरण झाल्याचा कट रचला!
संदेशाने माजली घबराट
दुपारी चारच्या सुमारास सावंत यांना एक धक्कादायक मेसेज आला. त्यात त्याने कॅम्पसमधील महत्त्वाच्या चाव्यांचे लोकेशन सांगितले. अचानक असा संदेश मिळाल्याने सावंत यांना शंका आली. त्यांनी ऋषिराजला कॉल केला, पण फोन बंद! घरी गोंधळ माजला.
कुटुंबीय आणि सावंत यांनी चौकशी सुरू केली. ड्रायव्हरकडून माहिती मिळाली की ऋषिराजला विमानतळावर सोडले आहे. त्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालं.
विशाखापट्टणला थांबवलं विमान!
ऋषिराज कोणीतरी पळवून नेलं की तो स्वतःहून गेलाय, याचा तपास सुरू असतानाच मोठा ट्विस्ट समोर आला. तो एका खासगी विमानाने थेट बँकॉकला जात असल्याचे समजले. या घटनेची माहिती वरपर्यंत पोहोचली आणि अखेर विशाखापट्टण येथे हे विमान उतरवण्यात आले!
पोलीस पुढील तपास करत असून, हा कौटुंबिक तणावाचा स्फोट की काही वेगळाच डाव, याची उकल लवकरच होणार आहे!