मागील भागात आपण पाहिले: फेसबुक लाईव्हच्या नादात पिंट्याची चांगलीच फजिती झाली होती. आता तुळजापूरच्या विकास आराखड्यावरून नवा वाद पेटला आहे…
धाराशिव जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू झाल्यावर फेसबुक पिंट्या काही दिवस शांत होता. म्हणतात ना, ‘अती तिथे माती’, तसंच त्याचा लाईव्हचा अतिरेक झाला होता. पण पिंट्या म्हणजे ‘बिन पेंद्याचा लोटा’, कधी कुठे गडबड करेल याचा नेम नाही. आता त्याने आपला मोर्चा वळवला होता तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकडे.
आणि इथेच एंट्री झाली ‘उबाठा’च्या वाघाची! हा वाघ म्हणजे संसद भवनात नाही, तर सोशल मीडियावर डरकाळी फोडणारा प्राणी. त्याने अचानक फेसबुक पिंट्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला. व्हिडिओमध्ये पिंट्या तुळजाभवानी मंदिराचं शिखर पाडण्याबद्दल ‘विचार’ करत असल्याचं (म्हणजे त्याच्या भाषेत ‘दूरदृष्टी’ दाखवत असल्याचं!) दिसत होतं.
उबाठाच्या वाघाने पिंट्याला चांगलंच घेरलं. “हा बघा यांचा खरा चेहरा! आता म्हणतात बदनामीचं षडयंत्र! मग तेव्हा शिखर पाडायचं म्हटलं, ते काय होतं? विकास की विनाश?” वाघाच्या डरकाळीने सोशल मीडियावर भूंकप आला.
पिंट्याची हवा टाइट झाली. नेहमीप्रमाणे तो स्वतः मैदानात उतरण्याऐवजी आपल्या ‘पोपट’ नामक प्रवक्त्याला पुढे ढकलणार होता, पण यावेळेस वातावरण जरा जास्तच गरम होतं. त्यात भर म्हणून मुंब्राचे ‘भाई’ जितोद्दीन पुन्हा तुळजापुरात अवतरले. त्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट मंदिरासमोर ठिय्या मांडला. “कोणीही शिखराला हात लावून दाखवा! मुंब्रा स्टाईलने उत्तर देऊ!” जितोद्दीन यांच्या आगमनाने पिंट्याचे पाय आणखीनच थरथरले.
परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून पिंट्यांनी नेहमीचा ‘बदनामीचे षडयंत्र’चा पाढा वाचायला सुरुवात केली. “माझे विरोधक माझ्या चांगल्या कामांना बदनाम करत आहेत! तो व्हिडिओ एडिट केलेला आहे! मी कधीही शिखर पाडण्याचा विचार…”
त्यावर उबाठाचा वाघ आणखी जोरडला, “अहो पिंट्याजी! तुमचाच व्हिडिओ आहे तो! तुम्हीच बोलत आहात! मग हे षड्यंत्र कोणाचं? तुमच्याच बोलण्याचं तुमच्या विरोधात?” वाघाच्या या गुगलीने पिंट्याची विकेट जायची वेळ आली होती.
शेवटी नाइलाजाने पिंट्याने आपल्या पोपटला पत्रकार परिषदेसाठी पाठवले. पोपट नेहमीप्रमाणे घाबरलेला होता, त्याचे पाय थरथरत होते आणि तो पिंट्याच्या शिकवलेल्या स्क्रिप्टचे शब्द विसरत होता. कसंबसं त्याने वाचायला सुरुवात केली, “उबाठाच्या वाघाने दाखवलेला व्हिडिओ… तो अर्धवट आहे… पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय… कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही… आणि अंतिम अहवाल आल्यानंतर… पिंट्या भाऊ… म्हणजे आमचे पिंट्या भाऊ… योग्य निर्णय घेतील.”
आता लोकांना प्रश्न पडला होता – तो व्हिडिओ अर्धवट असो वा पूर्ण, फेसबुक पिंट्याची आणि त्याच्या पोपटांची नेमकी भूमिका काय आहे? शिखर पाडायचं आहे की नाही? की फक्त ‘विचार’ करून जनतेला ‘विकास’ दाखवायचा आहे?
पिंट्या आणि त्याचे पोपट सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. अंतिम अहवाल कधी येईल आणि त्यात काय असेल, याबद्दल कुणालाही काही पत्ता नाही. पण सोशल मीडियावर मात्र ‘शिखर पाडा की ठेवा’ यावरून जोरदार ‘लाईक्स’ आणि ‘कमेंट्स’चा पाऊस पडत आहे.
आणि या सगळ्या गोंधळात, ‘मटका किंग’ मन्या आणि ‘ड्रग्ज माफिया’ पिटू बाजूला बसून हसतायत. मन्या म्हणतोय, “शिखर पाडलं तर नवीन बांधकामाचा ठेका आपल्यालाच मिळणार!” तर पिटू डोळे मिचकावत म्हणतोय, “आणि नाही पाडलं तर लाईव्ह करून देवाला पण ‘स्पॉन्सर’ शोधू!”
पुढील भागात पाहूया, या ‘शिखर नाट्या’चा शेवट काय होतो…
विनोदी टीप: पिंट्याच्या पोपटला आता पत्रकार परिषदेला पाठवण्यापूर्वी ‘शिखर’ आणि ‘अहवाल’ हे शब्द दहा वेळा बोलण्याची सक्ती केली जातेय, म्हणे स्पेलिंग तरी बरोबर येईल!
पुढील भाग लवकरच…
– बोरूबहाद्दर