• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

खानापुरात क्षुल्लक कारणावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण

 लोखंडी पाईप व काठ्यांचा वापर, सात जणांवर गुन्हा

admin by admin
January 24, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
349
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा (जिल्हा धाराशिव): खानापूर (ता. परंडा) येथे गैरकायद्याची मंडळी जमवून एकाच कुटुंबातील पाच सदस्यांवर लोखंडी पाईप आणि काठीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध आई-वडिलांसह, पत्नी आणि मुलीलाही मारहाण करण्यात आली असून, फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात सात जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापु महादेव गटकुळ (वय ४६, रा. खानापुर, ता. परंडा) असे फिर्यादीचे नाव आहे. दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बापु गटकुळ हे आपल्या घरी होते. यावेळी गावातीलच आरोपी कुमार गटकुळ, योगेश गटकुळ, ऋषीकेश बारसकर, अनिल गटकुळ, राम गटकुळ, तुषार मुळीक आणि कृष्णा गटकुळ हे सर्वजण एकत्र जमून आले.

आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवत बापु गटकुळ यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी बापु गटकुळ यांच्यासह त्यांची पत्नी, आई सुमन, वडील महादेव आणि मुलगी अंकिता यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप व काठीने अमानुष मारहाण केली. यात सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीदरम्यान आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान केले आणि “तुम्हाला जिवे ठार मारू,” अशी धमकी दिली.

या घटनेनंतर जखमी बापु गटकुळ यांनी दि. २३ जानेवारी २०२६ रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी वरील सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) (दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग), ३५१ (२)(३) (धमकी), ३२४(४) (नुकसान), १८९(२), १९१(२), १९१(३) (दंगल/गैरकायद्याची मंडळी) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या सामुदायिक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना अडवून पट्ट्याने बेदम मारहाण; नाईकनगर शिवारातील घटना, तिघांवर गुन्हा

Next Post

भररस्त्यात तलवारीसह दहशत; परंडा पोलिसांची धडक कारवाई, तरुणावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भररस्त्यात तलवारीसह दहशत; परंडा पोलिसांची धडक कारवाई, तरुणावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ: घरफोडी, दुचाकी आणि विजेच्या तारेची चोरी; तिन्ही प्रकरणी गुन्हे दाखल

March 12, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंब: जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; १५ ते १८ जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण

March 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार;

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची तक्रार केल्याचा राग; वाघोलीत ५६ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नाचताना पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर लोखंडी कत्तीने हल्ला

March 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group