लोहारा : कानेगाव येथील शेतकरी गुलाब रब्बीलाल ईनामदार (वय ७५) यांचा २३ जुलै २०२४ रोजी शेतात विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ईनामदार हे आपल्या शेतात विळ्याने गवत कापत असताना त्यांचा विळा विजेच्या तारेला लागल्याने हा अपघात घडला.
या प्रकरणी ईनामदार यांचे पुत्र ईलाई गुलाब ईनामदार यांनी अमोल पांडुरंग पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मृत ईनामदार यांनी पाटील यांना वारंवार विजेचा धोकादायक असलेला तार काढून टाकण्यास सांगितले होते. परंतु, पाटील यांनी निष्काळजीपणामुळे तार न काढल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.