• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर: सव्वादोन लाख हेक्टरवरील पिकांना फटका

ऑगस्ट महिन्याचे अनुदान वाटप सुरू - जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

admin by admin
September 25, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर: सव्वादोन लाख हेक्टरवरील पिकांना फटका
0
SHARES
602
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या, विशेषतः गेल्या चार दिवसांतील अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार तब्बल दोन लाख २६ हजार ७०६ हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्ह्यातील ३६३ गावांमधील एक लाख ९८ हजार ३७५ शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून, २०७ जनावरे दगावली आहेत. तसेच, एक हजार ४८ घरांची पडझड झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू केले असून, बाधित नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच वेळी सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे आणि ऑगस्ट महिन्यातील मंजूर अनुदानाच्या वाटपाचे काम वेगाने सुरू आहे. ऑगस्ट महिन्याचे अनुदान वाटप आजपासून सुरू करण्यात आले असून, सध्याच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवून तातडीने निधीची मागणी केली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, दोन लाख दोन हजार ८३९ हेक्टर जिरायती, २१ हजार ४४२ हेक्टर बागायती आणि दोन हजार ४२५ हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. विविध ठिकाणी अडकलेल्या ४९८ नागरिकांना एनडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. पुरामुळे १६ गावांचा संपर्क तुटला होता, जो आता पूर्ववत करण्यात आला आहे.

अतिवृष्टीचा फटका केवळ शेतीलाच नाही, तर सार्वजनिक मालमत्तेलाही बसला आहे. जिल्ह्यात १५ तलाव फुटले असून, १२ रस्ते आणि तीन पूल वाहून गेले आहेत. याशिवाय, एक हजार ३७ कच्च्या घरांची पडझड झाली असून सात घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. चार गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला बसला आहे. येथील ५२ हजार ५०० शेतकऱ्यांचे तब्बल ५८ हजार १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात कमी फटका कळंब तालुक्याला बसला आहे.

तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक तपशील:

तालुका बाधित शेतकरी बाधित गावे बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
धाराशिव २६,००० ५४ ४४,०६०
तुळजापूर ३७,००० ४८ ३९,८५०
उमरगा ५१,३४५ ८१ ५४,२०६
लोहारा ६,००० ११ ७,६९०
भूम २२,००० ३० १७,३२०
परंडा ५२,५०० ९१ ५८,१००
कळंब २३० २५ ३३०
वाशी ३,३०० २३ ५,१५०

जिल्ह्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, जिल्हा प्रशासन पंचनामे आणि अनुदान वाटपाच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी काळात पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव : पालकमंत्र्यांच्या नावाने ५.९५ लाखांचा गंडा, पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी

Next Post
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव : पालकमंत्र्यांच्या नावाने ५.९५ लाखांचा गंडा, पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group