नळदुर्ग – पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 जुलै 2024 रोजी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास एक हिट अँड रन अपघात घडला. निलेगाव शिवारात इटकळ ते अक्कलकोट रस्त्यावर नरसप्पा भगवंत सोनटक्के यांच्या शेताजवळ अज्ञात मोटरसायकल चालकाने एका अनोळखी व्यक्तीला (वय अंदाजे 60 वर्षे) धडक दिली. या अपघातात अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
पोलीस पाटील मधुकर नामदेव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 281, 106,(1), 125(अ), 125(बी), सह 134 अ.ब., 184 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अज्ञात मोटरसायकल चालकाचा शोध घेत आहेत.