नळदुर्ग – जळकोट रोडवर 30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9:30 वाजता एका हिट अँड रन अपघातात 32 वर्षीय इस्माईल अमीन शेख यांचा मृत्यू झाला. पांढऱ्या रंगाच्या कारने (क्रमांक MH 16 CY 9567) शेख यांना धडक दिली. कार चालक जखमी शेख यांना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला.
मृत इस्माईल शेख यांचे भाऊ महबूब अमीन शेख यांनी 8 सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 281, 106(1) सह मोटार वाहन कायदा कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस फरार कार चालकाचा शोध घेत आहेत.