धाराशिव – कौडगाव तांडा येथे घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजय गणेश राठोड यांच्या घरातील कपाटातील डब्यात ठेवलेले २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत ८५,३९० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी विजय राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, करण राजाभाऊ राठोड हा संशयित आरोपी असून त्याने १४ सप्टेंबर २०२४ ते १२ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान ही चोरी केली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
परंडा येथे किराणा दुकानातून १५,०00 रुपयांचा माल चोरी
परंडा: शहरातील शिवाजी नगर येथील एका किराणा दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला आणि २४ इंची ओणीडा टीव्ही आणि डीव्हीआर असा एकूण १५,००० रुपये किमतीचा माल लंपास केला.
शंकर भगवान कोकाटे (वय ६८) यांच्या मालकीच्या या दुकानात ही चोरी ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ या वेळेत घडली. कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३८० (४), ३०५(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून चोरट्याचा शोध सुरू आहे.