• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा येथे कत्तलीसाठी गायींची निर्दयी वाहतूक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकावर गुन्हा

admin by admin
April 11, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
81
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : कत्तलीच्या उद्देशाने टेम्पोमधून गायींची निर्दयपणे आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टेम्पोसह ९ गायी असा एकूण ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास कळंब रोडवरील येरमाळा पुलाजवळ करण्यात आली.

याप्रकरणी दशरथ किसन जरडकर (वय ४४ वर्षे, रा. भूम, ता. भूम, जि. धाराशिव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांनी गुरुवारी पहाटे येरमाळा पुलाजवळ सापळा रचला. यावेळी कळंब रोडवरून येणारा टाटा कंपनीचा ८०७ टेम्पो (क्र. एमएच ११ एजी ७५३८) पोलिसांनी थांबवला.

टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत निर्दयपणे कोंबलेल्या अवस्थेत ९ गोवंशीय (गावरान व जर्शी) गायी आढळून आल्या. या गायींना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, दाटीवाटीने टेम्पोत भरून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

पोलिसांनी तात्काळ टेम्पो आणि त्यातील ९ गायी जप्त केल्या. जप्त केलेल्या गायी आणि वाहनाची एकूण किंमत ५ लाख ६ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी दशरथ जरडकर याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा, मोटार वाहन कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

येरमाळ्याजवळ भरदिवसा ऑटो रिक्षातील महिलेची सोनसाखळी हिसकावली

Next Post

तुळजापुरात कोयता बाळगून दहशत माजवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा

तुळजापुरात कोयता बाळगून दहशत माजवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group