उमरगा : शासनाने महाराष्ट्रात बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. उमरगा शहरातील चौरस्ता भागात एका पान टपरीवर छापा टाकून पोलिसांनी ५ हजार ७२० रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
उमरगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:२० वाजता करण्यात आली. उमरगा शहरातील गजबजलेल्या चौरस्ता भागात असलेल्या ‘ज्योती पान शॉप’ या दुकानात अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर दुकानाची झडती घेतली असता, आरोपीने विक्रीसाठी साठवून ठेवलेला शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी घटनास्थळावरून विमल पान मसाला आणि व्ही-१ (V1) तंबाखू असा एकूण ५,७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीचे नाव:
ज्ञानेश्वर मधुकर सुर्यवंशी (मूळ रा. हराळी, ता. उमरगा, सध्या रा. राम मंदिर, उमरगा)
पोलीस कारवाई:
याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर सुर्यवंशी याच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





