मुरुम पोलिसांनी दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ७ वाजता अक्कलकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर राधिका पेट्रोल पंपाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव दिलीप तात्याराव सुर्यवंशी (४७ वर्षे) असून तो मळगी, ता. उमरगा, जि. धाराशिव येथील रहिवासी आहे.
सुर्यवंशी यांच्या ताब्यात असलेल्या अशोक लिलॅन्ड कंपनीच्या हायवा टिपर क्र. के.ए. २८ बी ५२८९ मध्ये ३ ब्रास वाळू (किंमत १८,००० रुपये) आढळून आली.
पोलीस अंमलदार शंभुदेव शिवाजी रणखांब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. ३०३(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.