धाराशिव : पिकअपमध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करताना पकडलेल्या आरोपींनी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रईस रशीद सय्यद, सिध्दीक (दोघेही रा. खिरणी मळा) आणि तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हातलाई देवी मंगल कार्यालय जवळ पिकअप क्रमांक एमएच 25 पी 5718 मध्ये दोन गायी आणि एक म्हैस यांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला करून पळ काढला. या घटनेत काही पोलीस जखमी झाले आहेत.
आरोपींविरुद्ध प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंध कायदा आणि प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.