धाराशिव : कळंब तालुक्यातील चोराखळीचे माजी सरपंच खंडेराव एकनाथ मैंदाड यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व विभागीय आयुक्त यांनी केले रदद केले आहे. ग्रामपंचायत अधिनियम १२४ प्रमाणे कर वसुलीची प्रक्रीया राबविली नाही तसेच राष्टीय पेयजल योजनेमध्ये अनियमीतता केली म्हणून विभागीय आयुक्तांनी हा दणका दिला आहे.
सन २०२० मध्ये झाालेल्या निवडणुकीत खंडेराव एकनाथ मैंदाड हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडूण आले तसेच ते ग्रामपंचायत चोराखळीचे सरपंच म्हणून निवडूण आले. त्यांनी २०२०-२०२३ पर्यंत ग्रामपंचायत चोराखळीचे सरपंच पद भूषविले. सदरील कार्यकाळात सरपंच म्हणून कायदयाने निर्देशित केलेले कर्तव्य पार पाडण्यात कसुर केला म्हणून माजी सरपंच ॲड मिराजी मैंदाड यांनी महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (1) नुसार कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज दाखल केला सदर तक्रारी अनुशंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या तर्फे चौकषी होऊन सदरील चौकशी अहवाल माननिय विभागीय आयुक्त छ. संभाजीनगर यांच्याकडे योग्य त्या कारवाईस्तव सादर केला.
माजी सरपंच यांनी ग्रामपंचायत अधिनियम १२४ प्रमाणे कर वसुलीची प्रक्रीया राबविली नाही तसेच राष्टीय पेयजल योजनेमध्ये अनियमीतता केली. अशा आशयाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर जी चौकशी करण्यात आली त्यामध्ये २३.०३.२०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत प्रोसिडिंग मध्ये पान क्र. १६ व १७ कोरे सोडून त्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांनी स्वाक्षरी केल्याचे आढळून आले तसेच सदरील प्रोसिडिंग हे सभा झाल्यानंतर २२ दिवस विलंबाने लिहल्याचे आढळून आले. तसेच २९.०४.२०२१ , ३१.०५.२०२१, ३१.०७.२०२१ व ३१.०८.२०२१ रोजी झाालेल्या सभेच्या प्रोसिडिंग मध्ये प्रत्येकी दोन पाने कोरी ठेवुन त्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांनी सहया केल्याचे आढळून आले. तसेच चोराखळी येथिल NH-52 हा रस्ता इतर जिल्हा मार्ग दर्जाचा असून तो उपविभागाच्या अकत्यारीत आहे व सदरील रस्त्यावर स्वस्त धान्य दुकान नंबर २ हे अतिक्रमीत असताना त्यावर कुठलीही कारवाई सरपंच या नात्याने केलेले आढळली नाही. अशा आशयाचा अहवाल विभागीय आयुक्त याच्याकडे सादर झाला.
सदर अहवालाच्या अनुशंगाने माननीय विभागीय आयुक्त छ. संभाजीनगर यांनी सरपंच खंडेराव मैंदाड व तकार कर्ते ॲड मिराजी मैंदाड यांनी नोटीस बजावली असता तक्रारकर्ते ॲड मिराजी मैंदाड यांच्यातर्फे ॲड सुशांत चौधरी व ॲड सुजीत पाटील यांनी लेखी तसेच तोंडी युक्तीवाद करुन सरपंच यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांचे कर्तव्य पार पाडलेले नसुन ब-याच कामात अनियममता केलेली असल्यामुळे व ते चौकशी अंती सिदध झाल्यामुळे महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार सदस्य सरपंच किंवा उपसरपंच यांनी अनियमता केलेली असेल तर त्यांना पदावरुन निष्काशित करण्यात यावे असा युक्तीवाद सादर केला. सरपंचाच्या वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की त्यांनी १७.०८.२०२३ रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिलेला असून सध्या ते फक्त सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करता येणार नाही.
तक्रारकर्ता व सरपंच दोन्हींची बाजु ऐकून घेऊन माननिय विभागीय आयुक्त खंडेराव मैंदाड यांनी जरी सरपंच पदाचा राजीनामा दिला असला तरी ते महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (२) आणि कलम ३९ (१) अन्वये दोषी आढळल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत चोराखळी ता. कळंब जि. धाराशिवच्या सदस्या पदावरुन उर्रवरित कालावधिसाठी अपात्र घोषीत केले. मुळ तक्रारदार ॲड मिराजी मैंदाड यांच्या वतीने ॲड सुशांत चौधरी व ॲड सुजीत पाटील यांनी बाजू मांडली.