कळंब – तालुक्यातील डिकसळ येथील एका व्यापाऱ्याच्या गोडावून मधील सुपारीचे ४५ पोते ( किंमत १६ लाख ) चोरुन नेणाऱ्या दोन चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून कळंब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
फिर्यादी नामे- महादेव मनोहरराव घुले, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब, जि. धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता. कळंब येथील सुपारीचे गोडवुनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.12.2023 रोजी 05.00 ते दि. 02.12.2023 रोजी 07.00 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन गोडावून मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16,60,125 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव घुले यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे गुरनं 506/2023 कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उप विभाग कळंब हद्दीतील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणेकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस पथक हे कळंब येथे आले असता पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब येथील गुरनं 506/2023 कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. हा कल्पनानगर, पारधी पिढी, कळंब ता. कळंब जि. धाराशिव येथील- 1) शंकर मच्छिंद्र काळे, 2) श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार व इतर यांनी केला असुन ते सध्या कल्पनानगर पारधीपिढी येथे लपून बसले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून आरोपी नामे-1) शंकर मच्छिंद्र काळे, 2) श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार दोघे रा. कल्पानगर, पारधी पिढी, कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना आज दि. 03.12.2023 रोजी कल्पना पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन अधिक विचारपूस करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी यांचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला पैकी सुपारीचे 23 पोते,6,95,175 ₹ व निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर हेड क्र एमएच 13 BR 2587 असा एकुण 9,95,175 ₹ चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी कळंब पोलीस ठाणे येथे हजर केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- वासुदेव मोरे, यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार- औताडे, जानराव, फरहान पठाण, पोलीस नाईक/ जाधवर, पोलीस हावलदार- समाधान वाघमारे, हुसेन सय्यद चालक- पोलीस अमंलदार भोसले यांचे पथकाने केली आहे.