येरमाळा : डोक्यावर कर्ज झाले म्हणून पोराने बापाला अर्धी जमीन वाटून मागितली पण नकार दिल्याने पोराने डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याची घटना कळंब तालुक्यातील पनगाव येथे घडली.
मयत नामे- देवीदास भाउराव वाघमारे, वय 68 वर्षे यांचा दि. 09.03.2024 रोजी 20.00 ते दि. 10.03.2024 रोजी09.00 वा. सु. पानगाव शिवार शेत गट नं 138 मध्ये अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणासाठी डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी करुन देवीदास यांना ठार मारले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी रंधावणी देविदास वाघमारे, वय 65 वर्षे, रा. पनगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 10.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, अन्वये येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 59/2024 हा नोंदवला गेला होता.
सदर गुन्ह्यातील.तपासा दरम्यान पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर मयत याचा मुलगा याचेवर कर्ज होते तसेच बाप लेकाचे भांडण ही होते त्या अनुषंगाने पथकाने आरोपी नामे-बालाजी देवीदास वाघमारे, वय 25 वर्षे, रा. पनगाव ता. कळंब जि. धाराशिव यास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी काही एक सहकार्य केले नाही. त्यास अधिक विश्वासत घेवून त्याचे कडे चौकशी केली असता त्याने सागिंतले की दि. 09.03.2024 रोजी रात्री साधारण 19.30 वा. सु. मी माझे वडील मयत देवीदास वाघमारे यांच्याकडे माझेवर झालेल्या कर्जाचे अनुषंगाने अर्धी जमीन माझे नावावर करा किंवा जमीन विक्री करुन मला पैसे द्या जेणेकरुन माझेवरील कर्ज परतफेड करु शकेल असे सांगीतले असता वडीलांनी नकार दिल्याने मला वडीलांचा राग आल्याने मी वडील देवीदास वाघमारे यांचे डोक्यात मोठा दगड मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले व तेथून निघून गेलो अशी गुन्ह्याची कबुली दिल्यावरुन सदर गुन्ह्यातील इसम नामे बालाजी देवीदास वाघमारे, वय 25 वर्षे, रा. पनगाव ता. कळंब जि. धाराशिव यास अटक करण्यात आली.