कळंब – आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी , याकरिता कळंब तालुक्यातील तीन गावगुंडांना धाराशिव जिल्ह्यातून तीन महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे कळंब अंर्तगत राहाणारे इसम नामे- अतुल आबासाहेब कोल्हे रा. हावरगाव ता. कळंब जि. धाराशिव आणि शिवराज रामहरी लोकरे, उमेश महादेव लोकरे रा. खेर्डा, ता. कळंब जि. धाराशिव यांच्या विरुध्द पोलीस ठाणे कळंब येथे विविध कलमानुसार गुन्हे दाखल असल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणूका संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता त्यांचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे हद्दपारी करीता उप विभागीय दंडाधिकारी कळंब (SDM) यांचे कडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यावर सुणवणी होवून त्यांना प्रत्येकी तीन महिन्या पर्यंत धाराशिव जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक . गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवि सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत काबंळे, पोलीस उप निरीक्षक रामहरी चाटे,पोलीस हावलदार प्रशांत सोनटक्के, परमेश्वर जाधव, पोलीस नाईक शिवाजी राऊत यांनी केली आहे.