धाराशिव : कळंब तालुक्यातील शेळका येथील एका इसमाच्या घरावर पोलीसानी छापा मारून अवैधरित्या बाळगलेले पिस्तुल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथील इसम नामे शरद विठ्ठल पवार हा त्याचे राहते घरी पिस्टल सारखे शस्त्र कब्जात बाळगुन आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने दि. 01.05.2024 रोजी 18.00 वा. सु. सदर ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे एक इसम मिळून आला. पथकाने सदर इसमास त्याने त्याचे नाव- शरद विठ्ठल पवार, वय 25 वर्षे, रा. शेळका धानोरा ता. कळंब जि. धाराशिव असे सांगीतले. याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्टल सह 03 राउंड असा एकुण अंदाजे 25,900 ₹ किंमतीचा मुददेमाल मिळुन आला. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद पिस्टल व राउंड हे जप्त करुन त्याच्याविरुध्द कळंब पो.ठा. येथे गुन्हा क्र. 192/2024 हा शस्त्र कायदा कलम- 3/25 अन्वये नोंदवण्यात आला आहे.
अपघातात एक ठार
उमरगा : मयत नामे- रामलिंग महादु रामदडे, वय 44 रा. रामलिंग मुदगड ता. निलंगा जि. लातुर हे दि.23.04.2024 रोजी 19.45 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 सी 0152 वरुन मुळज रोड चौकाचे जवळुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र केए 32 एचए 2202 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून रामलिंग रामदडे यांच्या मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात रामलिंग रामदडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले.तसेच नमुद मोटरसायकल चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाउ फिर्यादी नामे- सोमलिंग महादु रामदडे, वय 53 वर्षे, रा. रामलिंग मुदगड ता. निलंगा जि. लातुर यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.