• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कानेगावात कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून दोन गटात राडा; परस्परविरोधी गुन्हे दाखल

admin by admin
May 21, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
0
SHARES
283
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा –  लोहारा तालुक्यातील कानेगाव शिवारात कुत्र्याला दगड मारण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून, त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शेत गट नंबर ११५/२ मध्ये घडली.

पहिल्या घटनेत, गोपाळ अर्जुन कदम (वय ३४ वर्षे, रा. कानेगाव) यांनी २० मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, साहेब राम करंडे, सविता साहेब करंडे, संतोष साहेब करंडे व सचिन साहेब करंडे (सर्व रा. कानेगाव) यांनी १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कानेगाव शिवारातील गट नं. ११५/२ मध्ये फिर्यादीस कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९१, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत, सविता साहेब करंडे (वय ६० वर्षे, रा. कानेगाव) यांनी २० मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोपाळ अर्जुन कदम (रा. कानेगाव) याने १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता त्याच ठिकाणी, म्हणजे कानेगाव शिवारातील गट नं. ११५/२ मध्ये, फिर्यादी सविता व त्यांचा मुलगा संतोष यांना कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुकक्यांनी व कुदळीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गोपाळ कदम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

एकाच कारणावरून झालेल्या या दोन्ही मारहाणीच्या घटनांमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोहारा पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; गंभीर आजार लपवून विवाह केल्याचा आरोप

Next Post

तुळजापुरात चुळीचे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

तुळजापुरात चुळीचे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group