लोहारा : फिर्यादी नामे-जितेंद्र प्रकाश जाधव, वय 29 वर्षे, रा. बेलवाडी ता. लोहारा जि. धाराशिव यांचे बेलवाडी शिवारातील शेतातुन अंदाजे 70,000₹ किंमतीच्या दोन जर्शी गायी काळ्या व तांबड्या रंगाच्या या दि. 18.06.2024 रोजी 22.30 ते दि. 19.06.2024 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जितेंद्र जाधव यांनी दि.21.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-शंकर लक्ष्मण वरपे, वय 44 वर्षे, रा. मस्सा खं. ता. कळंब जि. धाराशिव यांचे शेत गट नं. 714 मधील शेतातील 3 एचपी शक्ती कंपनीचा सोलार पंप अंदाजे 35,000 ₹ किंमतीचा हा दि. 18.06.2024 रोजी 20.00 ते दि.19.06.2024 रोजी 05.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शंकर वरपे यांनी दि.21.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-माजीद अली उस्मान सय्यद, वय 32 वर्षे, रा. खाजानगर गल्ली नं 20 धाराशिव यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची हिरो हंक कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एएफ 3296 ही दि.18.06.2024 रोजी 11.00 ते दि.19.06.2024 रोजी 05.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. . अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-माजीद अली सय्यद यांनी दि.21.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.