• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, April 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘लाडक्या लेकी’च्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारची संरक्षणाची सावली !

भाजपा महिला मोर्चा तर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन

admin by admin
October 11, 2023
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
‘लाडक्या लेकी’च्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारची संरक्षणाची सावली !
0
SHARES
45
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई – राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ‘लेक लाडकी’ योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील असंख्य गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळून काढणाऱ्या या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे भावी पिढीतील मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने दमदार पाऊल पडले आहे, असे श्रीमती वाघ यांनी म्हटले आहे. या योजनेद्वारे वयाच्या १८ व्या वर्षी मुलीच्या खात्यात एक लाखांपर्यंतची रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

श्रीमती वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे की , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ‘लेक लाडकी’ योजनेचा तपशील जाहीर केला होता. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या पूर्वसंध्येस आणि दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरु करून श्री. फडणवीस यांनी या संकल्पाची पूर्तता केली आहे. महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याच्या क्रांतिकारी निर्णयामुळे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाचा मोठा टप्पा गाठला गेला आहे. केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच महिलांना राजकीय आरक्षण जाहीर करून समान संधींचे वचन पूर्ण केले आहे.

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) द्वारे योजनेची रक्कम लाभार्थींना देण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास त्यापैकी १ मुलगी किंवा दोन्ही मुली असल्यास दोघींना या योजनेचा लाभ मिळेल, अशी माहितीही श्रीमती वाघ यांनी दिली.­­

 

Previous Post

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

अवैध गुटखा विक्रीप्रकरणी भूममध्ये एकावर गुन्हा दाखल; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

April 10, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोमांसविरोधी उमरगा-बेंबळी-धाराशिवमध्ये धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

April 10, 2026
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कत्तलीसाठी चालवलेल्या चार गायींची भूममध्ये सुटका; पोलिसांची धडक कारवाई, एकावर गुन्हा दाखल

April 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळ्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; दुचाकी, सोन्याची साखळी अन् लॅपटॉप लंपास; तीन गुन्हे दाखल

April 9, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात पार्किंगमध्ये राडा; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

April 9, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group