• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नाटकाचे तीन अंक: ‘पटसंख्या शून्य, पगार मात्र लाखोंचे’  — शिक्षण खात्याचा विदारक तमाशा उघड !

धाराशिव जिल्ह्यात शिक्षणाचे तीन - तेरा ...

admin by admin
April 4, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नाटकाचे तीन अंक: ‘पटसंख्या शून्य, पगार मात्र लाखोंचे’  — शिक्षण खात्याचा विदारक तमाशा उघड !
0
SHARES
846
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा तालुक्यातील प्रतिभाताई पवार हायस्कूल, जवळा (नि.) येथे ‘शिक्षण’ या पवित्र शब्दाची खिल्ली उडवणारे नाटक सध्या रंगत आहे. याचा पहिला अंक आज सकाळीच मंचावर आला — अर्थात गटशिक्षणाधिकारी यांच्या “तपासणी दौऱ्या”च्या रूपात!

पहिला अंक: गटशिक्षणाधिकारींची फक्त ‘चक्कर’

उस्मानाबाद ( धाराशिव ) जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला दिलेली भेट म्हणजे फक्त ‘दर्शनी दौरा’! शाळेत पोहोचताच त्यांनी कोणतीही तपासणी न करता मुख्याध्यापकाला विचारलं, “तुम्हीच तक्रार दिली का संघटनेकडे?”

हे विचारून अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी इथंच संपवली आणि परत आपल्या ऑफिसात जाऊन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी पाठवलेले तपासणीचे पत्र मुख्याध्यापकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर टाकून मोकळे झाले. पहिल्या अंकात एवढंच घडलं — म्हणजे नाटक सुरूच आहे!

दुसरा अंक: ‘तपासणी’चा खरा खेळ

शिक्षणाधिकारीच्या आदेशाचा अभिनय साकारण्यासाठी आज पुन्हा एकदा गटशिक्षणाधिकारी शाळेत हजर झाले. यावेळी त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या मोजली — आणि धक्कादायक सत्य समोर आलं. जवळपास प्रत्येक वर्गात शून्य विद्यार्थी!

यानंतर या नाटकात ‘सुपरव्हिलन’सारखी एन्ट्री झाली संस्थाचालक राहुल कारकर यांची. त्यांनीच खळखळून कबुली दिली की, “या शाळेत काहीच नाही, पण आठ शिक्षक बसून पगार खात आहेत.”

हे सांगताना ते विसरले की, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना २५ लाख रुपये देऊन स्वतःच्या पत्नीचे पद या भकास शाळेत बसवण्यासाठी तेच धडपड करत आहेत. म्हणजे शाळा नसताना पद आहे, विद्यार्थी नसताना पगार आहे — आणि वरून राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त!

तिसरा अंक: ‘नाटकाचा शेवट की सुरुवात?’

या संपूर्ण प्रकारात गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक एकाच रंगमंचावर आपापले रोल वठवत आहेत. चौकशी फक्त कागदावर, जबाबदारी शून्य, आणि सिस्टीमला फक्त “पगार वसूल” करण्याची काळजी!

हे सगळं नाटक आता उघड पडलं आहे — पण नेहमीप्रमाणे कारवाई मात्र ‘शून्य’. पत्रं लिहून, व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करून आणि गप्पा मारून शिक्षण खातं पवित्र राहत नाही, हे कोणीतरी या अधिकाऱ्यांना सांगायला हवं.


बोरूबहाद्दर म्हणतो, 
“विद्यार्थी नसले तरी शाळा आहे, शिक्षक आहेत, पगार आहे, पण शिक्षण? — फक्त नावापुरतं. आता हे नाटक बंद व्हायला हवं!“

 

Previous Post

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोर अटकेत, ६ गाड्या जप्त

Next Post

उमरग्यातील वनविभाग रामभरोसे; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कार्यालयात थांगपत्ता नाही

Next Post
उमरग्यातील वनविभाग रामभरोसे; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कार्यालयात थांगपत्ता नाही

उमरग्यातील वनविभाग रामभरोसे; अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कार्यालयात थांगपत्ता नाही

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group